ETV Bharat / state

Shishir Shinde Resignation: उद्धव ठाकरे गटाच्या आणखी एका शिंदेंचा धक्का; माजी आमदार शिशिर शिंदे यांनी केला जय महाराष्ट्र - शिशिर शिंदे यांचा राजीनामा

माजी आमदार शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाचा राजिनामा दिला आहे. पक्षात घुसमट होत असल्याचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला आहे.

Former MLA Shishir Shinde
माजी आमदार शिशिर शिंदे
author img

By

Published : Jun 18, 2023, 10:47 AM IST

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार शिशिर शिंदे यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे उपनेते होऊन वर्ष झाले, तरी नेतृत्वाने मला अद्याप कोणतीही जबाबदारी दिलेली नाही, अशी नाराजी आपल्या राजीनाम्यात व्यक्त करून शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला सोड चिठ्ठी दिली आहे. शनिवारी रात्री त्यांनी आपला राजीनामा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना सुपूर्द केले.

उद्धव ठाकरे यांना पत्र : शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात, मागील महिने सातत्याने वेळ मागूनही उध्दव ठाकरे भेटत नसल्याचा आरोप केला आहे. सर्व प्रयत्न करूनही पक्षाध्यक्षांची भेट होणे, अशक्य झाले होते. यासोबतच त्यांनी आपल्याला आपल्या योग्यतेची काम मिळत नसल्याचेही राजीनामा पत्रात म्हटलं आहे. शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, मला चार वर्षे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही, त्यानंतर मला नेता हे शोभेचे पद देण्यात आले, त्यामुळे माझी चार वर्षे वाया गेली.

शिशिर शिंदे यांची राजकीय वाटचाल : शिशिर शिंदे यांची राजकीय वाटचाल पाहिली असता, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिशिर शिंदे यांनी त्यांना पाठिंबा देत शिवसेना सोडली. शिशिर शिंदे 2009 मध्ये भांडुप विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. आता या मतदार संघात सध्या खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे आमदार आहेत. यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर 19 जून 2018 रोजी शिशिर शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा :

  1. Thackeray group in Nashik : ठाकरे गटाला धक्का, संपर्क प्रमुख पदाची हकालपट्टी होताच जिल्हा प्रमुखांचा राजीनामा
  2. Ink Attack on Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांना शाईफेक करत मारहाण, कार्यक्रमाला फसवून निमंत्रण देल्याचा पोळ यांचा आरोप
  3. Shinde vs Fadnavis : मुख्यमंत्री शिंदे गटाला डिवचणारे शहरात लागले बॅनर, राज्यात शिंदे यांच्या जाहिराती नंतर बॅनरवॉर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.