मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत. आर्थिक पाहणी आढाव्यातून २.३ टक्के विकास दर कमी झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. देशाचा विकासदर ७ धरला तरी त्यापेक्षाही कमी आहे. कृषी, सेवामध्येही घसरण झाली आहे. साडेसहा कोटीपेक्षा अधिक कर्ज वाढला आहे. ४८ हजार कोटीपर्यंत व्याज द्यावे लागणार आहे. प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर हा बोजा पडेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या खर्चाचा ताळमेळ नाही : सरकारकडून विविध योजना आणि विकास कामांच्या घोषणा होतात. सुमारे दोन लाखांच्या तुटीची काही काम सरकार काढत आहे, त्या खर्चाला मेळ बसत नाही. कर्जाचा प्रचंड डोंगर वाढलेला आहे. सरकारकडून साडे अठरा पर्यंत गेल्याचे सांगितले जाते. एकीकडे कर्ज वाढवायचा आणि त्यावरील व्याज भरायचा, असा फंडा शिंदे-भाजप सरकारचा आहे. अनेक राज्यकर्त्यांनी यापूर्वी चांगली कामे केली. त्यावेळी एवढा कर्ज नव्हते. २०१४ पर्यंत अडीच लाख कोटी कर्ज होते. मागील पाच वर्षात साडेसहा कोटी पर्यंत कर्ज वाढल्याचा ठपका भुजबळ यांनी केला.
गुजरात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : गुजरातसारखे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये कांदा उत्पादन कमी घेतले जाते. तरी ही साडे तीनशे कोटी रुपयावर मदत केली आहे. वाहतूक खर्च, निर्यातीसाठी मदत केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील अशी अपेक्षा करतो. परंतु, राज्य सरकार त्या पूर्ण करणार की नाही, असा प्रश्न भुजबळ यांनी विचारला. भाजप सत्तेत आल्यापासून भरमसाठ घोषणा करत आहे. विकासाच्या नावाखाली कर्ज वाढवण्यात येत आहे. सरकारचे कर्ज आणि जमाखर्चाचा ताळमेळ बसत नाही. महसूल उत्पन्न देखील मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. महसुली तूट मोठी आहे. दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यात काय आहे, हे समजेल असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सरकार विरोधात लोकांचा कल : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत. निवडणुका घ्यायच्या नाहीत, असा एकंदरीत कल सरकारचा दिसत आहे. मागील काही निवडणुकीत सरकार विरोधात लोकांनी मतदान केले आहे. ताबडतोब म्हणून का घेतल्यास त्याचा परिणाम होईल, हे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात वारेमात घोषणा व उधळपट्टी केली जाण्याची शक्यता माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : Maharashtra Politics: शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून... वाचा काय म्हणाले जयंत पाटील