ETV Bharat / state

Anil Deshmukh : अनिल देशमुखांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली - अनिल देशमुख ईडी कार्यालयात

माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आज सोमवार (दि. 16 जानेवारी)रोजी ईडी कार्यालयात हजेरी लावण्यासाठी हजर झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनानंतर त्या जामीन अर्जातील अटी व शर्तीनुसार अनिल देशमुख यांना प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्यासाठी यावे लागत आहे. ते जामिनावर तुरुंगाबाहेर आल्यानंतर आज तिसऱ्यांदा ईडी कार्यालयात आले होते.

Anil Deshmukh
माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख
author img

By

Published : Jan 16, 2023, 8:45 PM IST

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर त्यांना दर सोमवारी ईडीसमोर हजर राहावे लागते. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला होता. परंतु, सीबीआयने जामीनावरील स्थगिती आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी अर्ज दाखल केला, ज्याला मुंबई उच्च न्यायालयाने मंजूरी दिली. सीबीआयच्या विनंतीवरून उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात जामीन आदेशावरील स्थगिती 27 डिसेंबरपर्यंत वाढवली होती. त्यानंतर त्यांना 28 डिसेंबर रोजी जामीनावर सोडण्यात आले.

ऑक्टोबरमध्ये ईडीच्या खटल्यात जामीन मंजूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख नोव्हेंबर 2021 पासून तुरुंगात होते. त्यांना अंमलबजावणी संचालनालयाने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सीबीआयने त्यांना एप्रिलमध्ये अटक केली होती. देशमुख यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते. ते बराच काळ मुंबईतील आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. उच्च न्यायालयाने त्यांना ऑक्टोबरमध्ये ईडीच्या खटल्यात जामीन मंजूर केला होता.

काय आहे प्रकरण : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे.

सीबीआयना न्यायालयाने सुनावले : 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. दरम्यान, अनिल देशमुख यांना जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चांगलेच फटकारले होते. हे तुमचे आम्हाला वेळ द्या किती दिवस चालणार? या खटल्यात ठोस काहीच साध्य होत नसताना त्यांना किती दिवस जेलमध्ये ठेवणार असा उलट प्रश्नही न्यायालयाने सीबीआयला विचारले होते. त्याचवेली न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला.

हेही वाचा : Anil Deshmukh :अखेर देशमुख जेलबाहेर! स्थगिती मागणे थांबवा, सत्र न्यायलायने सीबीआयला झाेडपले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.