मुंबई : राज्याचे माजी आरोग्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे गटाचे समर्थक दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दीपक सावंत यांचा प्रवेश हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांचे सहकारी माजी केंद्रीय मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. आता दीपक सावंत यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सावंतांना दिला होता डच्चू : डॉ दीपक सावंत यांनी दुर्गम भागात शिवसेनेसाठी मोठे काम केले आहे. आरोग्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्यांची सेवा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, कोरोनाच्या काळातही आम्ही चांगले काम केले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला होता. त्यावेळी शिवसैनिक विशेषत: युवासेना दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती पुढे आली.
मंत्रिपदाचा राजीनामा : जानेवारी 2019 मध्ये डॉ दीपक सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिवसेनेने विलास पोतनीस यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला. त्यावेळी दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिक आणि युवासेनेत नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती पुढे आली.
डझनभर मंत्री शिंदे गटात : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने इनकमिंग सुरुच असुन ठाकरे गटातून आऊट गोईंग सरुच आहे. आतापर्यंत रामदास कदम, अर्जुन खोतकर, तानाजी सावंत, विजय शिवतारे, दीपक केसरकर, दादा भुसे, उदय सामंत असे अनेक कॅबिनेट मंत्री शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असतानाही शिंदे गटात सामील झालेल्या नेत्यांच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. डाॅ. दीपक सावंत यांच्या शिवसेनेत प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray Criticizes CM : २०२४ ची निवडणूक देशातील शेवटची निवडणूक असेल...