मुंबई - मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आपला निर्णय दिला होता. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ताशेरे ओढले होते. या निर्णयानंतर शनिवारी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट झाली. यावेळी सत्तासंघर्षावरील निकालावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु, यावर भगतसिंह कोश्यारी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोश्यारी-शिंदे भेटील महत्व - माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सध्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यात ते विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीला जास्ती महत्व आहे. शिवसेनेत बंड होऊन राज्यात सत्तांतर झाले त्यावेळी भगतसिंह कोश्यारी हेच राज्यपाल होते. त्यावेळी त्यांची भूमिका महत्वाची होती.
तत्कालीन राज्यपालांवर ताशेरे - महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मागील आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या निर्णयावर ताशेरे ओढले होते. कोश्यारी यांनी कागदपत्रांची योग्य तपासणी न करताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले होते. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
राज्यपाल-माजी राज्यपाल भेट - महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. कोश्यारी यांनी 16 मे रोजी राजभवनावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. ही भेट सदिच्छा भेट असली तरीसुद्धा सध्याच्या राजकीय परिस्थितीत या भेटीवर अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर शनिवारी कोश्यारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचीही भेट घेतली आहे.
हेही वाचा -