मुंबई - मुस्लीम आरक्षण संविधानाला धरून नसेल तर त्याला आमचा विरोध असेल, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ते विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.
-
राज्य सरकार मुस्लिम आरक्षण देणार आणि त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे विधान मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानपरिषदेत केले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
धर्माच्या आधारावर आरक्षण नको, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेची भूमिका काय, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. pic.twitter.com/MYtL0fguvt
">राज्य सरकार मुस्लिम आरक्षण देणार आणि त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे विधान मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानपरिषदेत केले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 28, 2020
धर्माच्या आधारावर आरक्षण नको, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेची भूमिका काय, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. pic.twitter.com/MYtL0fguvtराज्य सरकार मुस्लिम आरक्षण देणार आणि त्याला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे विधान मंत्री नवाब मलिक यांनी आज विधानपरिषदेत केले.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 28, 2020
धर्माच्या आधारावर आरक्षण नको, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेची भूमिका काय, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. pic.twitter.com/MYtL0fguvt
आज (शुक्रवारी) विधानसभेमध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुसलमानांना देखील धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठीचा प्रस्ताव मांडला. तसेच या आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे मलिक यांनी म्हटले. मात्र, याला आमचा विरोध आहे, असे म्हणत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. या अगोदर शिवसेना मुस्लीम आरक्षणाला विरोध करत होती. ती आता या सरकारमध्ये आल्यानंतर त्याला पाठिंबा देत आहे. तर आम्हाला हा मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देणे मान्य नाही. यामुळे ओबीसी आणि इतर अल्पसंख्याक समाजावर अन्याय होईल, असे म्हटले. तसेच महाविकास आघाडीच्या या तीन पक्षांमध्ये अगोदरच अनेक विषयांवर सेटिंग झालेली आहे, असा आरोप करत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
हेही वाचा - राज्यातील डॉक्टरांना आता लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे नियम लागू होणार
बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास विरोध होता. मात्र, आताचे हे राज्य सरकार धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे त्याला आमचा विरोध आहे. ज्यावेळी सदनात हा विषय येईल तेव्हा जर हे संविधानाला धरून नसेल तर आमचा विरोध असेल, अशी भूमिका फडणविसांनी मांडली. आणखी किती विषयात सेटिंग करून शिवसेनेने सरकार बनविले आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच कॅग अहवाल- सिडको घोटाळा आरोप याबाबत कोणीही काही सांगेल ते ऐकू नका. सभागृहात अहवाल आला की मी बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.