ETV Bharat / state

Holi 2023 : वर्षा निवासस्थानी होळी साजरी; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - CM Shinde on farmer celebrating Holi

राज्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झाले आहे. शेतकरी हे मायबाप असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वर्षा निवासस्थानी आज पहिल्यांदाच होळी साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Cm Shinde Holi with Farmer
Cm Shinde Holi with Farmer
author img

By

Published : Mar 6, 2023, 11:02 PM IST

मुंबई: राज्यभरात आज होळी व धुलीवंदनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत. आपल्या संस्कृतीत सणांची मोठी परंपरा असून खूप महत्व देखील आहे. होळी व धुलीवंदनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात आदरभाव, आनंद आणि रंगाची उधळण घेऊन यावा. महाराष्ट्रातील सगळी संकटे, अरिष्ट आणि दुःख या होळीत जळून खाक होऊ दे. सगळ्या द्वेष भावना, वाईट विचार होळीत नष्ट होऊ देत. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात सुख-समृद्धी, भरभराट होऊ दे, जनतेच्या आयुष्यात असेच नवनवीन रंग भरू दे या शुभेच्छा देत, महाराष्ट्रातील सर्व जनता राग, लोभ, मत्सर विसरून एकत्र येऊन सण जल्लोषात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पर्यावरण पूरक रंग वापरावेत, रासायनिक रंगाचा वापर टाळावा आणि होळी उत्सव साजरा करावा. ही धुळवड सगळ्यांना सुखाची, समृद्धीची आणि आनंदाची जावो. सण, उत्सव, संस्कृती, परंपरा जोपासणारा महाराष्ट्र आहे. कोविडच्या काळानंतर सगळीकडेच आनंदी आणि चांगलं वातावरण आहे. त्यामुळे सगळ्यांनी जल्लोषात उत्सव साजरा करावा, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

शिंदे-राऊत गटाची एकमेकांवर टीका: खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार असल्याच्या विधानावर मुख्यमंत्र्यांना छेडले असता, चांगले काहीतरी बोला, असा टोला लगावला. माझ्या त्यांना शुभेच्छा, सदिच्छा आहेत. तसेच सगळ्यांना चांगली सद्बुद्धी मिळावी, अशी खोचक टीका केली. राज्यात होळी आणि धुलीवंदन साजरा होत आहे. या निमित्ताने 'पचास खोके, एकदम ओके', महागाई विरोधात, केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध धोरण विरोधात उभारण्यात आल्या आहेत. राज्य सत्तेवर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधातील बहुतांश भागात उभारल्या आहेत. राज्य सरकारच्या विरोधात रोष जनतेने या निमित्ताने पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, दिवाळी आदी विविध सणातून शिंदे सरकारवर कुरघोडी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा शिंदे यांच्या सरकारला खोके सरकार संबोधण्यात आले असून सर्वच भागात या होळी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

हेही वाचा: Mumbai Rain Update : मुंबईमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, मार्चमध्ये तापमान वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.