मुंबई - केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 53 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन येणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 3 लाख 12 हजार रेमडेसिवीर मिळाले. आणखी 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर केंद्राकडून येणे बाकी आहे, असे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.
आणखी 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे. केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिल दरम्यान 4 लाख 53 हजार इंजेक्शन येणे अपेक्षित होते. मात्र, 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर कमी आले आहेत', अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली. तसेच केंद्र सरकारने मायलन, सिप्ला, झायडस कॅडीला, डॉ. रेड्डी आणि सनफार्मा या कंपन्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला पुरवण्याची जबाबदारी दिली होती. अद्याप त्या कंपन्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचंही शिंगणे यांनी सांगितले.
रोज 65 ते 70 हजार रेमडेसिवीरची गरज
महाराष्ट्रात सध्या 6 लाख 70 हजार कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करावा. 1 लाख 70 हजार इंजेक्शन अजून केंद्र सरकारकडून आलेले नाहीत. ते त्वरित राज्य सरकारला देण्यात यावेत. राज्यात रोज 65 ते 70 हजार रेमडेसिवीर लागत असल्याची माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
हेही वाचा - ठाण्याच्या १०२ वर्षांच्या आज्जीची कोरोनावर मात, तरुणांना दिला 'हा' कानमंत्र
हेही वाचा - 'केंद्राकडून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये लपवाछपवी'