ETV Bharat / state

Flood Affected Maharashtra : महाराष्ट्रात दरवर्षी पूर का येतो

author img

By

Published : Jul 27, 2023, 5:29 PM IST

पावसाची अनियमितता हा प्रश्न गंभीर होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी या अस्मानी संकटामुळे कायम संकटाचा सामना करत असतो. त्याच बरोबर प्रत्येक वर्षी येणाऱ्या पुरामुळे एकीकडे मानवी सामर्थ, धैर्य आणि मदतीच्या घटनापण समोर येत असतात. तर दुसरीकडे मानवा सोबतच मालमत्तेचे होणारे नुकसान हजारो लोकांना प्रभावित करत असते. पाहूया राज्य दरवर्षी पाण्याखाली का येते (Flood Affected Maharashtra)

flood situation
पूरस्थिती

महाराष्ट्राचा एक भाग दरवर्षी दुष्काळ तसेच दुष्काळसदृश परिस्थिती अनुभवतो, तर राजधानी मुंबईसह कोकणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पूर येतो. मुंबईत पाणी साचण्याचे मुख्य कारण म्हणजे येथील जल वाहिन्यांची योग्य प्रकारे स्वच्छता न होणे हे समोर आलेले आहे. तसेच कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पावसाळ्यात वारंवार पुरस्थिती निर्माण होते असे सांगण्यात येते.

मुंबईचे तापमान वाढले : पूर येण्यामागील मु्ख्य कारण म्हणजे हवामान बदल हे आहे. आणि त्याची परिस्थिती आणखीनच बिकट होत आहे. साधारण शतक भरात मुंबईचे सरासरी तापमान 2.4 अंशांनी वाढल्याचे समोर आले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागा नुसार, मुंबईत अलीकडच्या काही वर्षात नऊ वेळा मुसळधार म्हणजे 204.5 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

पावसाचा कालावधी कमी झाला: पाऊस जवळपास तसाच आहे. परंतु त्याच्या पडझडीचा कालावधी कमी झाला आहे. म्हणजे पावसाचे तास आधी 100 होते. त्यामुळे आता ते 60-70 वर आहेत आणि 50 पर्यंत जातील असे सांगितले जात आहे. याचा अर्थ जो पाऊस 100 तासांत पडतो तो आता 60-70 तासांत पडत आहे. त्यामुळे त्याचा वेग वाढला आहे.

सिमेंटीकरणाने समस्या वाढवली : शहरांचा विकास ओबाड-धोबड पद्धतीने झाला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी सोय नाही. पूर्वी नाले, ओढे, उतारावरून पाणी वाहत असे. मात्र शहरातील सिमेंटीकरणामुळे पाणी वाहून जाण्याची सोय नाही. भूमिगत गटारांमधून फक्त घरातील पाणी वाहून जाते. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नाही, परिणामी पाण्याची पातळी सतत वाढत आहे असे तज्ञ सांगतात.

2005 पासूनच्या प्रमुख घटना: 2022: महाराष्ट्रात 1 जून 2022 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत मुसळधार पावसाची नोंद झाली. यात 120 जणांचा जीव गेला आणि पूराच्या घटना समोर आल्या. यात एकूण 95 जण जखमी झाल्याची नोंद आहे. राज्यातील 316 गावे पुरामुळे गंभीरपणे बाधित झाली. सुमारे 19 हजार 135 जणांना बाहेर काढण्यात आले आणि 106 मदत शिबिरे उभारण्यात आली.

2021: मध्ये महाराष्ट्रातील काही भागात 48 तासांत 1,000 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मुंबईत, 23 जुलै रोजी गोवंडी परिसरात एक इमारत कोसळली. यात 7 जण मरण पावले तर 3 जखमी झाले. 18 जुलै रोजीच्या मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे मुंबई उपनगरातील चेंबूर आणि विक्रोळी येथे अनेक घरे उद्ध्वस्त झाले. यावेळी 20 जणांचा मृत्यू झाला. .

2020: ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने हाहाकार माजवला. नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 175 गावांमधून 53 हजारापेक्षा अधिक जणांना स्थलांतरित करण्यात आले. या चार जिल्ह्यांमध्ये ९२,००० हून अधिक लोक बाधित झाले. त्यापैकी 27,091 नागपुरातून, 18,192 भंडारा, 5,667 चंद्रपूर आणि 2,274 गडचिरोली जिल्ह्यातून स्थलांतरित करण्यात आले.

2019: पावसामुळे, विशेषत: उपनगरात मुंबईत 26 जुलै रोजी 944 मिमी व नंतर सर्वाधिक 24 तासांच्या पावसाची नोंद झाली. ज्यामुळे एक हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. तेव्हा 375.2 मिमी पाऊस नोंदवला गेला, जो अपवादात्मकपणे भारी श्रेणीत येतो. 24 तासांचा पाऊस 5 जुलै 1974 च्या बरोबरीचा होता जेव्हा 375.2 मिमी पाऊस पडला होता, जो 2005 च्या रेकॉर्डपूर्वीचा सर्वाधिक होता.

सातत्याने येतो पूर : 2016 मधे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात, जुलै 2013 च्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पूर आल्याची नोंद झाली. 10 ते 13 ऑगस्ट 2006 या कालावधीत झालेल्या पावसामुळे विदर्भातील काही भाग जलमय झाला होता. अतिवृष्टीमुळे 29 जुलै , 5 ऑगस्ट आणि 17 सप्टेंबर 2005 दरम्यान पूर आला. 1998 ते 2022 पर्यंत महाराष्ट्रात एकूण 233590 (हेक्टर) पूरग्रस्त क्षेत्रांची नोंद झालेली आहे.

हेही वाचा

  1. Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ, एनडीआरएफच्या 13 तुकड्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तैनात
  2. Heavy Rain In Nagpur : नागपुरात पावसाचा हाहाकार; ८ तासात १२१ मिलिमीटर पावसाची नोंद
  3. Adivasi women Problem : अडचणींचा पाऊस! ना रस्ते, ना आरोग्याची सुविधा; गरोदर महिला आदिवासी गावपाडे सोडून नातेवाईकांच्या आश्रयाला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.