ETV Bharat / state

Mumbai Crime: 'तो' करायचा महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल; व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायचा प्रायव्हेट पार्टचे फोटो

author img

By

Published : Feb 19, 2023, 8:22 PM IST

महिलांना अश्लील व्हिडियो कॉल करणाऱ्या एका फ्लिपकार्ट डिलिव्हरी एजंटला मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपीने 30 हून अधिक महिलांसोबत हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले.

Mumbai Crime
अश्लील व्हिडिओ कॉल

मुंबई: हा फ्लिपकार्ट डिलिव्हरी एजंट फेसबुकवर नोकरीच्या संधी असणाऱया गृपमध्ये सामील व्हायचा. यानंतर महिलांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर शोधून त्यांना अश्लील व्हिडिओ कॉल करायचा. त्याने 30 पेक्षा अधिक महिलांना व्हॉटसअपवरून फोटो पाठविले आहेत. तो महिलांना महिलांचेच फोटो दाखवायचा असे पोलिसांनी सांगितले.

तांत्रिक तपासामुळे आरोपी गजाआड: पोलिसांच्या माहितीप्रमाणे, तो महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवायचा आणि व्हिडियो कॉलिंगवर खासगी भागसुद्धा दाखवायचा. मुंबई पोलिसांना याविषयी तक्रार प्राप्त झाल्यावर त्यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून अखेर आरोपीला मालाड पोलिसांनी अटक केली. ज्योतिराम बाबुराव मनसुले असे आरोपीचे नाव आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे.

पोलिसाचे अश्लील वर्तन: औरंगाबाद मधील जवाहर नगर परिसरातील मयूरबन कॉलनी येथील महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार एका पोलीस उपनिरीक्षकाने परिसरातील काही महिलांची 17 फेब्रुवारी, 2023 रोजी दारूच्या नशेत छेड काढली. महिलांच्या घराच्या भिंतीवर तो बॉल मारून खेळत होता. त्यावेळी तिथे असलेल्या महिलांकडे अश्लील नजरेने पाहून त्यांना त्रास देत होता. काही महिलांनी त्याला अडवल्यावर अश्लील भाषेत त्यांच्याशी वर्तन केले. यानंतर काही महिला एकत्र आल्यावर सर्वच महिलांना त्रास देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी जवाहर नगर पोलिसात आपला मोर्चा वळवला, पोलिसावर कारवाई करा, यासाठी रात्री उशिरापर्यंत महिलांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडला.

पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकारी टल्ली: पोलीस उपनिरीक्षकाकडून केलेल्या गैरवर्तनानंतर महिलांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी महिलांची तक्रार घेतली. त्यावेळी आरोप असलेले अनिल बोडले तिथे आले. त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकाला व्हिडिओ कॉल करून महिलांना अश्लील भाषेत जाब विचारला. हा पोलिस अधिकारी शुद्धीवर नव्हता. हे त्या समोर आलेल्या व्हिडिओतून दिसून येत आहे. जवाहर नगर पोलिसांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. मात्र पोलिसांकडूनच गैरवर्तन होत असल्याने सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आमदारावरच फेकले सेक्सटॉर्शनचे जाळे: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांना सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात गोवणाऱ्या आरोपीला सायबर पोलीस पुणे यांच्याकडून 10 फेब्रुवारी, 2023 रोजी राजस्थानमधील भरतपूर येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीने आमदार माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावरून प्राप्त करून त्यांच्याशी व्हाट्सअपवर संपर्क केला. यानंतर त्यांना सेक्सटॉर्शनच्या प्रकारात अडकविण्याचा प्रयत्न केला.

मोबाइलमध्ये आढळले अश्लील व्हिडीओ: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रिजवान असलम खान (वय २४ वर्षे, रा. ग्रामसिंहली महाराज तालुका नगर, जिल्हा भरतपूर, राजस्थान) असे होते. त्याच्याकडे प्राथमिक तपास केला असता या गुन्ह्यात त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपीकडून एकूण चार मोबाईल संचार सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल्समध्ये स्क्रीन रेकॉर्ड केलेले 90 अश्लील व्हिडिओ मिळून आले होते. आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.

हेही वाचा: Dhirendra Shastri Brother: तोंडात सिगारेट, हातात कट्टा.. धीरेंद्र शास्त्री यांच्या धाकट्या भावाने लग्न समारंभात दलितांना धमकावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.