ETV Bharat / state

मुंबईतील पाच बोगस डॉक्टर अटकेत, सातवी नापसाचाही समावेश - Mumbai crime branck unit three

बनावट औषध देणाऱ्या 5 बोगस डॉक्टरना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 3 ने अटक केली आहे.

आरोपींना न्यायालयात
author img

By

Published : Oct 17, 2019, 3:08 PM IST

मुंबई - बनावट मेडिकल पदव्यांच्या आधारावर मुंबईतील भायखळा, नागपाडा सारख्या परिसरात दवाखाना उघडून पीडित रुग्णांना बनावट औषध देणाऱ्या 5 बोगस डॉक्टरना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 3 ने अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांना मिळलेल्या गुप्त माहितीवरून एकाच वेळी 5 वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी पाच बोगस डॉक्टरांना अटक करीत त्यांच्याकडून बनावट मेडिकल पदवी, युनानी औषधे व इतर साहित्य जप्त केले आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी

पोलिसांनी केलेल्या कारवाईत 5 अटक आरोपीत एक बोगस डॉक्टर शमशेर कादिर शेख (वय - 36 वर्षे) हा आरोपी कधीही शाळेत गेलेला नाही. मात्र, भायखळ्यात तो गेली 8 वर्षे जनसेवक आयुर्वेदिक दवाखाना चालवत होता. या बरोबरच अन्वर अकबर हुसेन (वय - 45 वर्षे) हा शिक्षण 10 नापास आहे. नईम मोहमदीया शेख (वय - 40 वर्षे) हा 7 वी नापास, नवाब अजगर हुसेन (वय - 36 वर्षे) हा 12 वी नापास आहे तर रिवाउद्दीन फाईमुद्दीन बंजारा (वय- 35 वर्षे) हा 8 वी पर्यंत शिकलेला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा - नो मनी नो वोट..! पीएमसी बँकेच्या ग्राहकांचा न्यायालयासमोर ठिय्या

अटक करण्यात आलेले पाचही बोगस डॉक्टर त्यांचा दवाखाना चालविण्यासाठी रेल्वे स्थानके, सार्वजनिक शौचालय, पोस्ट ऑफिस, इलेक्ट्रिक सप्लाय बॉक्स सारख्या ठिकाणी पोस्टर लावून लैंगिक उपचारावर जालीम उपाय केला, जाईल अशी जाहिरात देत होते.

त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना त्यांची समस्या अतिशय गंभीर असल्याचे भासवीत वेगवेगळ्या पावडरचे मिश्रण देत हजारो रूपये उकळत होते. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी 19 ओक्टॉबरपर्यंत पोलीस कोठडीत न्यायालयाने केली आहे.

हेही वाचा - 'हेडगेवार-गोळवलकरांचा भारत होऊ देऊ नका'

Intro:बनावट मेडिकल पदव्यांच्या आधारावर मुंबईतील भायखळा , नागपाडा सारख्यान परिसरात दवाखाना उघडून पीडित रुग्णांना बनावट औषध देणाऱ्या 5 बोगस डॉक्टरना मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 3 ने अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांना मिळलेल्या गुप्त माहितीवरून एकाच वेळी 5 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी मारीत पोलिसांनी पाच बोगस डॉक्टरना अटक करीत त्यांच्याकडून बनावट मेडिकल पडवीत, युनानी औषधे व इतर मेडिकल साहित्य जप्त केले आहेत.

Body:अटक बोगस आरोपीत एक निरक्षर

पोलिसांनी केलेल्या कारवाईत 5 अटक आरोपीत एक बोगस डॉक्टर शमशेर कादिर शेख (36) हा आरोपी कधीही शाळेत गेलेला नाही , मात्र भायखळ्यात तो गेली 8 वर्षे जनसेवक आयुर्वेदिक दवाखाना चालवत होता. या बरोबरच अन्वर अकबर हुसेन (45) याचे शिक्षण 10 नापास , नाईम मोहमादीया शेख (40) याचे शिक्षण 7 वी नापास , नवाब अजगर हुसेन (36) 12 वी नापास , व रिवाउद्दीन फाईमुद्दीन बंजारा (35) हा केवळ 8 वी पर्यंत शिकलेला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेले पाचही बोगस डॉक्टर त्यांचा दवाखाना चालविण्यासाठी रेल्वे स्थानके, सार्वजनिक शॉचालय , पोस्ट ऑफिस , इलेक्ट्रिक सप्लाय बॉक्स सारख्या ठिकाणी पोस्टर लावून लैंगिक उपचारावर जालीम उपाय केला जाईल अशी जाहिरात देत होते.।

Conclusion:त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना त्यांची समस्या अतिशय गंभीर असल्याचे भासवीत वेगवेगळ्या पावडरचे मिश्रण करून महागडी औषध देत असल्याचे सांगत हजारो रुपये उकळीत होते. या अटक आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी 19 ओक्टॉबर पर्यंत पोलीस कोठडीत न्यायालयाने केली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.