ETV Bharat / state

मुंबईतील व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या पाच आरोपींना अटक; मुख्य सूत्रधार शिर्डीचा - मुंबई व्यावसायिक अपहरण आरोपी न्यूज

अनेकदा पैशांसाठी किंवा वादापोटी व्यावसायिकांचे अपहरण केल्याच्या घटना घडतात. मुंबईमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अहमदनगरच्या शिर्डी येथील असल्याचे समोर आले.

kidnapping
अपहरण
author img

By

Published : Oct 15, 2020, 12:39 PM IST

मुंबई - आर्थिक वादातून मुंबईतील एका व्यावसायिकाचे दिंडोशी बस डेपो येथून अपहरण झाले होते. अपहरण करून व्यावसायिकाला नाशिक येथे नेणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. धक्कादायक म्हणजे या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार 2019च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आहे.

12 ऑक्‍टोबरला मुंबईतील दिंडोशी बस डेपो येथे पीडित व्यावसायिक हा त्याच्या गाडीमधून आला होता. त्याला जबरदस्तीने गाडीच्या बाहेर काढून त्याचे अपहरण करण्यात आले. पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून या गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी प्रदीप सुनील सरोदे (वय 34), आरिफ युनूस शेख (वय 30), सूर्यकांत भीमराव जाधव(वय 30), सुरज व्यंकट सूर्यवंशी (वय 29), महेश विश्वनाथ कांबळे (वय 26) या आरोपींना अटक केली आहे.

अपहरणाचा मुख्य सूत्रधार शिर्डीतील कुख्यात वाळू माफिया -

सीसीटीव्ही फुटेजचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले असता, प्रदीप सुनील सरोदे (वय 34) हा पोलिसांच्या अभिलेखावरील असल्याचे समोर आले. या आरोपी बद्दलची अधिक माहिती घेऊन पोलिसांनी खात्री केली. त्याचा या गुन्ह्यात सहभाग उघड झाला. सरोदे हा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचा कुख्यात गुन्हेगार व वाळूमाफिया आहे. त्याची परिसरात दहशत असल्याचेही समोर आले. पीडित व्यावसायिकाचे अपहरणकरून त्याला नाशिक येथे सोडून दिल्यानंतर आरोपी पालघर व ठाणे येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके बनवून नाशिक, पालघर, ठाणे या ठिकाणी पाठवली. या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

मुख्य आरोपीने लढवली होती लोकसभा निवडणूक -

अपहरणाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने शिर्डी मतदारसंघातून 2019 लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याला पंधरा हजार मते मिळाली होती. शिर्डी परिसरात तो वाळू माफिया म्हणून कुख्यात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.