मुंबई: मुंबईतील पहिल्या ॲपल स्टोअरच्या उद्घाटनाच्या वेळी शेकडो चाहते उपस्थित होते. हे स्टोअर 20,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. आज 11 वाजल्यापासूनच लोक येथून खरेदीसाठी थांबले होते. मुंबईत सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या स्टोअरमध्ये 100 सदस्यांची टीम काम करत आहेत. हे ॲपल स्टोअर एक्झिक्युटिव्ह 20 भाषांमध्ये ग्राहक सेवा देण्यास सक्षम आहेत. मुंबईतील पहिल्या ॲपल स्टोअरच्या भव्य उद्घाटनामुळे लोक खूश झाले आहेत.
दुसरे अधिकृत स्टोअर 20 एप्रिल रोजी: ॲपल 18 एप्रिल रोजी मुंबईत पहिले स्टोअर उघडत आहे, तर दुसरे अधिकृत स्टोअर 20 एप्रिल रोजी दिल्लीत उघडेल. ॲपलने सांगितले की, दोन्ही स्टोअर्स स्थानिक प्रभावानुसार डिझाइन केले आहेत. कंपनीचे सीईओ टिम कुक म्हणाले, भारताची संस्कृती अतिशय सुंदर आणि अविश्वसनीय ऊर्जा आहे. आमच्या ग्राहकांना पाठिंबा देण्याच्या, स्थानिक समुदायांमध्ये गुंतवणूक करण्याच्या आणि मानवतेची सेवा करणार्या नावीन्यपूर्ण इतिहासासह चांगले भविष्य घडण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतातून ॲपलची निर्यात पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. हा आकडा भारतात बनवलेल्या फोनच्या एकूण निर्यातीपैकी निम्मा आहे. टीम कुक दिल्लीत पंतप्रधानांव्यतिरिक्त माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांचीही भेट घेणार आहेत.
टिम कुकसोबत एक नाईट आऊट : सेलिब्रिटींनी अॅपलच्या सीईओसोबतचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या कार्यक्रमाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, 'अॅपलचे सीईओ टिम कुकसोबत एक नाईट आऊट'. फोटोंमध्ये अभिनेत्री तिचा मुलगा रणबीरसोबत अॅपलच्या सीईओसोबत पोज देताना दिसत आहे. त्याचवेळी ऑस्कर विजेते एआर रहमानने देखील एक फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'आम्ही कशाबद्दल बोलत आहोत? काही अंदाज?