ETV Bharat / state

मुंबई : नेस्कोत उभारले जाणार देशातील पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर - नेस्कोत उभारले जाणार पीडियाट्रीक कोविड सेंटर

गोरेगावमधील नेस्को कोविड सेंटरमध्ये 400 बेडसचे स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. तर पालिका रुग्णालयाच्या धर्तीवर मुंबईतील सर्व कोविड सेंटरमध्ये पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक वॉर्ड तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

Nesco pediatric covid center news
मुंबई : नेस्कोत उभारले जाणार देशातील पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर
author img

By

Published : May 6, 2021, 4:57 PM IST

मुंबई - मार्चमध्ये सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरण्यास सुरुवात झाली आहे. जून अखेरीस परिस्थिती सुधारेल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येईल, ती या दोन्ही लाटेपेक्षा मोठी असेल आणि यात लहान मुलांना जास्त धोका निर्माण होईल, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यामुळे पालकांची भीती चांगलीच वाढली आहे. तर ही बाब लक्षात घेता आता मुंबई महानगर पालिका आणि आरोग्य यंत्रणा या लाटेला थोपवण्यासह लहान मुलांना या लाटेत काही होऊ नये, झालेच तर त्यांना तत्काळ योग्य उपचार मिळावे यादृष्टीने तयारीला लागल्या आहेत. त्यानुसार गोरेगावमधील नेस्को कोविड सेंटरमध्ये 400 बेडसचे स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. तर पालिका रुग्णालयाच्या धर्तीवर मुंबईतील सर्व कोविड सेंटरमध्ये पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक वॉर्ड तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. दरम्यान नेस्कोतले 400 बेडसचे हे पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर देशातील पहिले सेंटर असेल, असा दावा ही केला जात आहे.

तिसरी लाट लहान मुलांच्या मुळावर? -

देशात आतापर्यंत दोन लाटा आल्या असून दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरू असतानाच आता तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. दुसरी लाट जून-जुलैमध्ये पूर्णतः ओसरेल आणि सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येईल, असा इशारा राज्य कोविड टास्क फोर्ससह इतरही तज्ज्ञांकडून दिला जात आहे. चिंतेची बाब म्हणजे ही तिसरी लाट अधिक घातक असेल आणि ती सर्वाधिक लहान मुलांना बाधित करेल, असेही तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पहिल्या लाटेत वृद्ध, तर दुसऱ्या लाटेत तरुण सर्वाधिक बाधित झाले. तर आता तिसरी लाट लहान मुलांना बाधित करेल, असे म्हटले जात आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 18 वर्षापासून पुढील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. तेव्हा लस घेतलेले नागरीक तिसऱ्या लाटेत बऱ्यापैकी सुरक्षित असतील. त्यांना कोरोना झाला, तरी तो सौम्य असेल असा दावा तज्ज्ञ करत आहेत. अशावेळी लस न मिळणारा गट हा लहान मुलांचा असणार आहे. त्यामुळे कदाचित तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण अधिक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाने लहान मुलांना घेरले -

जगात कोरोनाचा कहर सुरू होऊन एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला. परदेशात कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अगदी चौथ्या लाटा आल्या. पण या लाटेत कुठेही लहान मुलांना मोठा धोका निर्माण झाला नाही. पण ब्राझीलमध्ये मात्र सद्या लहान मुले मोठ्या संख्येने कोरोनाबाधित होत असून आतापर्यंत अंदाजे 2000 मुले येथे दगावल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. ब्राझीलमधील स्ट्रेन घातक असल्याने हे घडत असल्याचे सांगितले जात आहे. तर आता भारतात तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, मुंबईचा विचार केला, तर मुंबईत लहान मुले आतापर्यंत सुरक्षित असल्याचे चित्र आहे. 4 मे पर्यंतच्या पालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार 0 ते 10 वयोगटातील 11 हजार 144 मुले बाधित झाली असून यात 55 टक्के मुले, तर 45 टक्के मुली आहेत. महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे यातील केवळ 17 मुले दगावली आहेत. त्याचवेळी 11 ते 20 वयोगटातील 28 हजार 869 मुले बाधित झाले आहेत. यातही 55 टक्के मुले आणि 45 टक्के मुली असून यातील 33 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा विचार करता एकूण बाधित रुग्णांपैकी केवळ 3 टक्के बाधित हे 0 ते 10 वयोगटातील, तर 6 टक्के बाधित 11 ते 20 वयोगटातील आहेत. ही आकडेवारी दिलासादायक आहे.

महिन्याभरात तयार होणार पीडियाट्रीक कोविड सेंटर -

तज्ज्ञांचा तिसऱ्या लाटेबाबतचा इशारा लक्षात घेत लहान मुलांच्या जीवाशी खेळ नको, असे म्हणत आता आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत. आजच्या घडीला पालिका रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये लहान मुलांना उपचार दिले जात आहेत. नायर, केईएम, सायनसारखी मोठी रुग्णालये वगळली, तर मुलांसाठी स्वतंत्र कोविड वॉर्ड नाही. त्यांना इतर रुग्णांसह उपचार दिले जात आहेत. त्यात त्यांची संख्या खूपच कमी आहे. पण आता लहान मुलांना स्वतंत्र वॉर्डात आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार देणे तिसऱ्या लाटेत गरजेचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व कोविड सेंटरमध्ये उपलब्ध जागेत स्वतंत्र पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक वॉर्ड तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तर नेस्कोमध्ये मात्र 400 बेडसचे पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. याविषयी नेस्कोच्या सेंटर टप्पा-2 चे अधिष्ठाता डॉ राजेश डेरे यांना विचारले असता त्यांनी 400 बेडसचे पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर येथे बांधण्यात येणार आहे. यात ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस असणार आहेत. आताच यासंबंधीचा निर्णय झाला असून आता प्राथमिक कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या सेंटरबाबत किंवा खर्चाबाबत आताच काही सांगता येणार नाही. असे असले तरी हे या सेंटरमध्ये लहान मुलांच्या उपचारासाठी सर्व सुविधा आणि बालरोग तज्ज्ञ उपलब्ध असतील, असे त्यांनी सांगितले आहे. तर लवकरच या कामाला सुरुवात करत महिन्याभरात याचे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचेही डॉ. डेरे यांनी सांगितले आहे.

बीकेसी आणि मुलुंड कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र पीडियाट्रीक वॉर्ड -

काकाणी यांच्या निर्देशानुसार आता सर्व कोविड सेंटरमध्ये पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक वॉर्ड तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार मुलुंड कोविड सेंटरमध्ये 100 बेडसचा स्वतंत्र पीडियाट्रीक वॉर्ड तयार केला जात आहे. यात 50 ऑक्सिजन तर 50 आयसीयू बेड असतील, अशी माहिती मुलुंड कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे यांनी दिली आहे. तर येथे लहान मुलांसोबत गरज पडल्यास त्यांच्या पालकांना रहाता यावे, यादृष्टीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर बालरोगतज्ज्ञ डॉक्टर ही येथे 24 तास उपलब्ध असणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. तसेच बीकेसी कोविड सेंटरमध्ये ही 100 बेडसचा पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक वॉर्ड तयार केला जात असल्याचे बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली आहे. तर उर्वरित सेंटरमध्ये ही 100 ते 250 बेडसचे पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक वॉर्ड तयार करण्यात येत आहेत. एकूणच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना योग्य उपचार मिळावे, यासाठी यंत्रणा तयार होत आहेत. पण तिसरी लाट आली तरी आपल्या मुलांना काही होणार नाही, यादृष्टीने त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी आता पालकांनी ही तयार होणे गरजेचे आहे. तर बाहेर, कामाला जाणाऱ्या पालकांनी मुलांच्या संपर्कात येऊ नये. खूपच गरज असली तरच मुलांना सर्व काळजी घेत घराबाहेर काढावे. तसेच मुलांना जराही ताप, सर्दी खोकला आला तर त्यांना त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हेही वाचा - 'निरी'च्या संशोधकांना यश; ड्राय स्वॅबच्या माध्यमातून आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट अवघ्या तीन तासात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.