मुंबई - गेल्या शुक्रवारपासून मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सायन पुलाच्या दुरुस्तीचे काम रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. या पुलाचे दुरूस्तीचे पहिल्या आठवड्यातील काम पूर्ण झाले असून या पुलावरून मंगळवारी सकाळपासून एकेरी वाहतूक सुरू केली असून परिसरातील वाहतूक कोंडी कायम आहे.
हेही वाचा -'जीएसटी भवन आगीची एसआयटी चौकशी करा; दहाव्या मजल्याची माहिती लोकांसमोर समोर आणा'
सायन पुलावरील वाहतुकीची वर्दळ पाहता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळने 14 फेब्रुवारी ते 6 एप्रिल दरम्यान आठवड्यातील चार दिवस पुलाचे बेरिंग बदलण्याचे काम हाती घेतले आहे. 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा पूल मुंबई शहर व उपनगरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी महत्वाचा दुवा आहे. या पूलाच्या बेरिंग मध्ये पोकळी निर्माण झाल्याने जड वाहतूक वर्षभर बंद करण्यात आली होती. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी मुंबईकडून करण्यात आले होते. यामध्ये पूलाच्या 170 बेरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती.
हेही वाचा -'कोरेगाव भीमा प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार'
वर्षभर या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला वेळ लागला. मात्र, आता या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तरी वाहतूक विभागाने वेगवेगळ्या मार्गावरून या पुलाकडे येणारी व जाणारी वाहतूक वळली असली तरी परिसरात वाहतूक कोंडी कायम असल्याचे दिसून येत आहे.