ETV Bharat / state

Mumbai News: 'हा' त्रास होत असल्याने, थांबा नसताना देखील चेतनला वलसाडला उतरायचे होते - हायड्रोसीलचा त्रास

मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंहने गोळीबार करत चार जणांची हत्या केली होती. या प्रकरणी चेतनला हायड्रोसील त्रास होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mumbai News
आरपीएफ जवान चेतन सिंहने गोळीबार केला
author img

By

Published : Aug 2, 2023, 10:29 PM IST

मुंबई : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाडे ५.३० वाजताच्या सुमारास आरपीएफ पोलीस कॉन्स्टेबल चेतन कुमार सिंह याने बेछूट गोळीबार करून आरपीएफच्या एएसआय टिकाराम मीना आणि ३ प्रवाशांचा जीव घेतला. त्यानंतर बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपी चेतनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी चेतन कुमार सिंहला एएसआय टीकाराम आणि सहाय्यक सुरक्षा आयुक्त सुजित कुमार पांड्येय यांनी समजावून सांगून देखील चेतनच्या गुप्तांगात दुखत असल्याचे सांगून वलसाडला उतरण्यासाठी हट्ट करत होता. मात्र, त्याला त्या ट्रेनला वलसाडला थांबा नसताना देखील का उतरायचे होते? असा सवाल चौकशी करणाऱ्या पोलिसांना देखील पडला आहे. चेतनला हायड्रोसीलचा त्रास होत असल्याची सबब त्याने पांडेय यांना दिली. अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली.

हायड्रोसील म्हणजे काय ? : डॉक्टर अमोल वाघ यांनी सांगितले की, वाढत्या वयासोबतच पुरुषांना अनेक आरोग्य समस्या होतात. हायड्रोसील नावाचा आजार हा यामधीलच एक आहे. हा आजार पुरुषांच्या स्क्रोटम (अंडकोष पिशवी) संबंधीत असतो. टेस्टिकलच्या बाहेर दोन लेयर्स असतात. यामध्ये फ्लूइड भरलेले असते. एखाद्या कारणामुळे हे फ्लूइड टेस्किलच्या बाहेर जमा झाले तर हायड्रोसीलची समस्या होऊ शकते. यामध्ये स्क्रोटम (अंडकोष पिशवी) मोठे होते. यासोबतच यामध्ये तीव्र वेदना होता.

कॉन्स्टेबल चेतनची तब्येत बिघडली : जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर अर्ध्या तासाने बी 2 या एसी डब्यामध्ये असलेल्या टीम इन्चार्ज टीकाराम मीना आणि पोलीस कॉन्स्टेबल चेतन सिंह यांच्यासह तीन टीसी होते. दरम्यान टीकाराम यांनी पोलीस कॉन्स्टेबल आचार्य यांना कॉन्स्टेबल चेतनची तब्येत बिघडली असल्याचे सांगितले. त्यानंतर चेतनच्या अंगाला हात लावून आचार्य यांनी बघितले असता त्यांना त्याच्या अंगात ताप असल्याचे जाणवले नाही. त्यानंतर टीम इन्चार्ज टिकाराम मीना यांनी चेतनला दोन तीन तासांची ड्युटी बाकी आहे गाडी मुंबईला पोचल्यानंतर आराम कर, असे समजावले. मात्र, चेतन सिंह ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. म्हणून टीकाराम यांनी पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र यांना मुंबई सेंट्रल नियंत्रण कक्षात मोबाईलवर संपर्क साधला. त्या अधिकाऱ्यांनी देखील चेतनची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तब्येत बरी नसल्याने चेतनला वलसाडला उतरायचे असल्याच्या जिद्दीला पेटून उठला होता.

हायड्रोसीलचा त्रास होत होता : चेतन सिंह याने टीम इन्चार्ज टीकाराम यांच्याकडे कंट्रोल रूममधील अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी हुज्जत घातली. दरम्यान कंट्रोल रूमने सहाय्यक सुरक्षा आयुक्त सुजित कुमार पांडेय यांना संपर्क साधला आणि चेतन सिंहबाबत माहिती दिली. नंतर, ऑन ड्युटी नसताना देखील सुजित कुमार पांडेय यांनी कंट्रोल रूममार्फत रात्री 3.55 वाजतास टीम इन्चार्ज टीकाराम यांना चेतन सिंहशी बोलणे करून देण्यास सांगितले. दरम्यान सुजित कुमार पांडेय यांनी चेतनची विचारपूस करत त्याला हृदयात दुखत नाही ना याबाबत चौकशी केली. त्यावर चेतनने पांडे यांना त्याच्या गुप्तांगाच्याजवळ दुखत असल्याने चालता येत नसल्याबाबत सांगितले. त्याला हायड्रोसीलचा त्रास होत असल्याची सबब त्याने पांडेय यांना दिली असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली. त्यानंतर चेतन याला सुजित कुमार पांडेय यांनी तू ड्युटी करू नकोस कोचमध्ये झोपून आराम कर असे समजावले. तसेच टीम इन्चार्ज टीकाराम यांना चेतनचे शस्त्र दुसऱ्या पोलिसाकडे देऊन चेतनला आराम करण्यास देण्याचे आदेश देण्यात आले होते.

चेतनला वलसाडला का उतरायचे होते : चेतनचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सूचित कुमार पांडे यांच्याशी बोलणे करून देण्याअगोदर टिकाराम मीना यांनी पांडेय यांना चेतन व्यवस्थित असल्याचे सांगितले होते. चेतनची तब्येत ठीक नसल्याचे नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर बोरिवली रेल्वे स्थानकात सोय करण्यात आली होती. सहाय्यक सुरक्षा आयुक्तांनी सांगून देखील चेतन आराम न करता केवळ दहा-पंधरा मिनिटांसाठी झोपला आणि परत उठून तो रायफल मागू लागला आणि काही वेळातच चेतनने बेछूट गोळीबार सुरू केला. महत्त्वाचे म्हणजे जयपूर मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला सुरत वापी आणि बोरिवली असे थांबे आहेत. वलसाड हा थांबा नसून देखील चेतनला वलसाडला का उतरायचे होते, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच त्याचा तपास सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.