ETV Bharat / state

'या' जम्बो कोविड सेंटरमध्ये 'अशी' घेतली जाते अग्नीसुरक्षेची काळजी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये आग लागल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईच्या पाच ठिकाणी जम्बो फॅसिलिटी असलेल्या रुग्णालयांत आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाईडलाईननुसार यंत्रणा उभारण्यात आली आहे. येथे ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र उपलब्ध आहेत. तर, बिकेसी येथील कोविड सेंटरपासून 50 फुटावर मुंबई महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे.

जम्बो कोविड सेंटर
जम्बो कोविड सेंटर
author img

By

Published : Aug 24, 2020, 7:21 PM IST

मुंबई : जागतिक दर्जाचे शहर असलेली मुंबई कोरोना विषाणूची हॉटस्पॉट बनली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे रुग्णालयांमधील खाटा कमी पडल्याने पाच ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आली. याआधी देशभरात अनेक रुग्णालयात आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर येथील पाचही कोविड सेंटरमध्ये मुंबई अग्निशमन दलाच्या नियमांचे पालन केले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील 'या' पाच जम्बो कोविड सेंटरमध्ये घेतली जाते अग्निसुरक्षेची काळजी

मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण मार्चमध्ये आढळून आला होता. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले. पालिका सरकारच्या रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्याने खासगी रुग्णालयेही पालिकेने ताब्यात घेतली. त्यानंतरही खाटा कमी पडल्याने सरकार आणि पालिकेने पुढाकार घेऊन जम्बो फॅसिलिटी असलेली वरळी, बिकेसी, गोरेगाव, दहिसर, मुलुंड या ठिकाणी तात्पुरती रुग्णालये उभारली आहेत.

जम्बो फॅसिलिटी असलेल्या या रुग्णालयात आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाईडलाईननुसार यंत्रणा उभारण्यात आली आहे. येथे ठिकठिकाणी अग्निशमन यंत्र उपलब्ध आहेत. तर, बिकेसी येथील कोविड सेंटरपासून 50 फुटावर मुंबई महापालिकेचे अग्निशमन केंद्र आहे. यामुळे आग लागल्यास ती त्वरित विझवली जाऊ शकते, अशी माहिती एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी व बिकेसी कोविड सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांनी दिली. बिकेसीप्रमाणेच इतर जम्बो सेंटरमध्येही अग्निसुरक्षेची काळजी घेण्यात आल्याची माहिती जम्बो सेंटरच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जम्बो कोविड सेंटरमध्ये अग्नी सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आता जम्बो सेंटरमध्येच उपचार -

मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्याने शाळा, हॉटेल व विभागीय कोविड सेंटर बंद करण्यात येत आहेत. यापुढे कोरोना रुग्णांवर जम्बो कोविड सेंटरमध्येच कोरोनाचे उपचार केले जाणार आहेत. जम्बो कोविड सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या, लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या सेंटरमध्ये सामान्य खाटांसह आयसीयू, ऑक्सिजन खाट तसेच व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

खाटांची क्षमता -

पालिका आरोग्य विभागाने ५ जम्बो कोविड सेंटर उभारले आहेत. वांद्रे - कुर्ला संकुलात एमएमआरडीए मैदानावर दोन जम्बो कोविड सेंटर उभारले असून तेथे २ हजार खाटांची क्षमता आहे. वरळी एनएससीआय येथे एक हजार, गोरेगाव नेस्को येथे २ हजार, दहिसर येथे १ हजार ५००, मुलुंड चेक नाका येथे १ हजार खाटा आहेत.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: बीकेसी कोविड सेंटरमध्ये मृत्यू संख्या वाढतेय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.