मुंबई - भायखळा परिसरातील माझगाव येथील जीएसटी बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने यावेळी बिल्डिंगमध्ये कोणीही अडकलेले नव्हते. तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी ही आग का लागली याबाबत चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.