ETV Bharat / state

नरिमन पॉईंट येथील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या 'सर्व्हर रुम'ला आग, आग नियंत्रणात - मुंबई आग दुर्घटना

नरिमन पॉईंट येथील जॉली मेकर चेंबर 2 इमारती मधील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या सर्व्हर रूमला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीत जीवित हानी झाली नसून आग सध्या आटोक्यात आहे.

आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे जवान

author img

By

Published : Jun 25, 2020, 8:35 AM IST

मुंबई - नरिमन पॉईंट येथील जॉली मेकर चेंबर 2 इमारती मधील बँक ऑफ बहरिन अँड कुवैतच्या सर्व्हर रूमला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीवर सकाळी 7 वाजता अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळवले आहे.

इमारतीच्या तळमजल्यात ही बँक आहे. जॉली मेकर चेंबर 2 ही इमारत तळमजल्यासह 14 मजल्याची आहे. या आगीत बँकेतील फर्निचर, संगणक, यूपीएस बॅटरी, विद्यूत तारा, महत्वाची कागदपत्र जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मानखुर्द मंडाळा ट्रान्झिस्ट कॅम्प, लोरोईलाही मस्जीद जवळ, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथे एका भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे 3 फायर वाहन, 5 जम्बो वॉटर टँकर, 3 वॉटर टँकर व 2 रेस्क्यू वाहने उपस्थित होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर 9 वाजून 48 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते.

हेही वाचा - मुंबईत 2434 रुग्णांची एकाच दिवशी कोरोनावर मात तर 1144 नवीन रुग्णांची भर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.