ETV Bharat / state

Kishori Pednekar : कुचकामी यंत्रणेमुळे आग; किशोरी पेडणेकर यांचा आरोप

करीरोड येथील अविघ्न पार्क या इमारतीला आग ( Avighna Park building caught fire ) लागली होती. बईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Former Mayor Kishori Pednekar ) यांनी यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप केला. इमारतीत चांगले वायरिंग आणि प्रशिक्षित कर्मचारी असायला हवेत अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

Kishori Pednekar
किशोरी पेडणेकर यांचा आरोप
author img

By

Published : Dec 15, 2022, 2:14 PM IST

मुंबई : गेल्या वर्षी करीरोड येथील अविघ्न पार्क या इमारतीला आग ( Avighna Park building caught fire ) लागली होती. या इमारतीला पुन्हा एकदा आग लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान या ठिकाणी मुंबई अग्निशमन दल कॉल येताच दाखल झाले. मात्र येथील सुरक्षा आणि इतर यंत्रणांना आगीपासून कसा बचाव करायचा याची माहिती नाही. येथील यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप ( Allegation that the system is ineffective ) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Former Mayor Kishori Pednekar ) यांनी केला आहे.

प्रशिक्षित कर्मचारी असायला हवेत : करीरोड येथील महादेव पालव मार्ग, भारत माता सिनेमा समोरील उत्तुंग अशा अविघ्न पार्क या इमारती मधील एका घरामध्ये आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पालिका कर्मचारी त्वरित दाखल होतात. अग्निशमन दलाचे जवान आपल्या जीवावर खेळून आग विझवतात. त्यांना दोष देणे योग्य नाही. इमारतीमध्ये चांगली वायरिंग, उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचारी असणे गरजेचे आहे. या इमारतीत चांगले वायरिंग आणि प्रशिक्षित कर्मचारी असायला हवेत अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

अविघ्न पार्कला आग : मुंबईच्या करी रोड येथील महादेव पालव मार्ग, भारत माता सिनेमा समोरील उत्तुंग अशा अविघ्न पार्क या इमारती मधील एका घरामध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला सकाळी १०.४५ च्या दरम्यान देण्यात आली. त्यानुसार मुंबई अग्निशमन दल मुंबई पोलीस आणि महापालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अकरा वाजण्याच्या सुमारास ही आग लेव्हल वनची असल्याची घोषणा मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात आली आहे. आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली असून या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

याआधीही लागली होती आग : अविघ्न पार्क या इमारतीला मागील वर्षीही आग लागली होती त्यावेळी या इमारतीची अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले होते. आग लागलेल्या ठिकाणावरून एका व्यक्तीने आपला जीव वाचवण्यासाठी उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा याच इमारतीला आग लागल्याने या इमारतीच्या अग्नी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.