ETV Bharat / state

गोरेगाव येथील एका दुकानांना भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

सकाळी गोरेगाव येथील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पश्चिम भागातील गणेश टिंबर दुकानाजवळ ही भीषण आग लागली आहे. या आगीत 7 कपड्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत.

घटनास्थळाचे छायाचित्र
घटनास्थळाचे छायाचित्र
author img

By

Published : Mar 30, 2021, 3:09 PM IST

Updated : Mar 30, 2021, 3:57 PM IST

मुंबई - सकाळी गोरेगाव येथील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पश्चिम भागातील गणेश टिंबर दुकानाजवळ ही भीषण आग लागली आहे. या आगीत 7 कपड्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीवर काही तासांनंतर अग्निशमन दलाचे चार बंब व पाण्याचे टँकर्सच्या सहयाने पाण्याचा मारा करत नियंत्रण मिळवण्यात आले. आगीमागचे नेमके अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, यावेळी अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिम, स्टेशन रोड, रोलिंग शॉपिंग सेंटर येथील एका दुकानाला मंगळवारी (दि. 30 मार्च) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाण्याचा मारा करत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

गोरेगाव येथील एका दुकानांना भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

आर्थिक हानी

या घटनेत कपड्यांची सात दुकाने जळाली आहेत. त्यामुळे आर्थिक हानी झाली आहे. तसेच, आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे दोन जवान अमृत गायकवाड (वय 40 वर्षे) आणि अनिल कुमार (वय 30 वर्षे) हे दोघेजण जखमी झाले आहेत. गायकवाड यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले व त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अनिल कुमार यांच्यावर कूपर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - सचिन वाझेंची आणखी एक गाडी एनआयएने केली जप्त

हेही वाचा - अल्पवयीन पीडिता आणि बलात्काऱ्याची एकत्रित धिंड, उर्मिला मातोंडकर भडकली

Last Updated : Mar 30, 2021, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.