मुंबई - वांद्रे येथील एमटीएनएल (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड) इमारतीला लागलेली आग अखेर आटोक्यात आली आहे. अग्निशामन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या ठिकाणी लेव्हल 4 ची आग लागली होती. अद्याप आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या इमारतीमधून 84 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
Live Updates :
- सर्वांना काढले सुखरुप बाहेर
- 84 जणांना काढले बाहेर
- 60 जणांना काढले बाहेर
- 22 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश
- 15 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश
- पहिल्यांदाच रोबोच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न
- इमारतीमध्ये 100 जण अडकल्याची भीती
- वांद्रे येथील 'एमटीएनएल' इमारतीला भीषण आग
या आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र, 100 जण या ठिकाणी अडकल्याची प्राथमिक मिळाली होती. या ठिकाणी पहिल्यांदाच रोबोच्या मदतीने आग विझवण्यात आली.
एमटीएनएलची ही ९ मजली इमारत असून इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली होती. मात्र, आगीचा धूर इमारतीच्या नवव्या मजल्यापर्यंत पसरला. त्यामुळे घाबरलेले कर्मचारी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले. त्यामुळे इमारतीच्या गच्चीवर जवळपास 100 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.त्यामधील सर्व 84 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.