ETV Bharat / state

मुंबईत तब्बल ७३ कोटींच्या भूगर्भातील पाण्याची चोरी, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल - भूगर्भातील पाणी चोरी

मुंबईतील काळबादेवी परिसरात गेल्या ११ वर्षांपासून भूगर्भातील पाण्याची चोरी सुरू होती. त्यामुळे ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका
author img

By

Published : Oct 17, 2019, 11:45 AM IST

मुंबई - काळबादेवी परिसरात तब्बल ७३ कोटी रुपयांचे पाणी चोरीला गेले आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी ६ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. भूगर्भातील पाणी चोरी प्रकरणी हा मुंबईतील पहिला गुन्हा असल्याचे सांगितले जात आहे.

73 crore water stolen mumbai
मुंबईत तब्बल ७३ कोटींच्या भूगर्भातील पाण्याची चोरी

पांड्या मेंशन या इमारतीचा मालक त्रिपुरादास पांड्या, प्रकाश पांड्या , मनोज पांड्या, अरुण मिश्रा, श्रावण मिश्रा, धीरज मिश्रा, असे आरोपींचे नावे आहेत. गेल्या ११ वर्षांपासून हा पाणीचोरीचा धंदा चालू आहे. त्यामुळे सुरेशकुमार धोका यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार पांड्या मेंशन इमारतीच्या आवारामध्ये तिनही पांड्या यांनी अधिकृतरित्या २ विहिरी खोदल्या होत्या. त्यानंतर या विहिरीमध्ये अनधिकृत वीज जोडणी घेतली. त्यामधून टँकर माफिया म्हणून ओळखले जाणारे तिन्ही मिश्रा यांच्यासोबत मिळून गेल्या २००६ ते २०१७ या काळात तब्बल ६ लाख टँकर पाणी उपसण्यात आले. त्याची किंमत जवळपास ७३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Intro:मुंबई पोलिसांच्या आजाद मैदान पोलिसांनी भूगर्भातील पाणी चोरी प्रकरणी 6 जनांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. भूगर्भातील पाणी चोरी प्रकरणी मुंबईतला हा पहिला गुन्हा सांगितला जात आहे.
Body:गेल्या 11 वर्षात तब्बल 73 कोटी रुपयांच्या भूगर्भजल चोरी प्रकरणी मुंबईतील काळबादेवी येथील बोमानजी मास्तर लेन मधील पांड्या मेंशन या इमारतीचा मालक त्रिपुरादास पांड्या, प्रकाश पांड्या , मनोज पांड्या यांच्यासह टँकर माफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 6 जनांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Conclusion:या प्रकरणातील तक्रादार सुरेशकुमार धोका यांच्या तक्रारीनुसार पांड्या मेंशन इमारतीतील कंपाउंड मध्ये त्रिपुरादास पांड्या , मनोज पांड्या व प्रकाश पांड्या यांनी अधिकृतरित्या 2 विहिरी खोदल्या होत्या. या विहिरीत अनधिकृत वीज जोडणी घेत टँकर माफिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुण मिश्रा, श्रावण मिश्रा , धीरज मिश्रा यांच्या सोबत मिळून सन 2006 ते 2017 या काळात 6 लाख टँकर पाणी उपसण्यात आले आहे. ज्याची किंमत 73 कोटी रुपये असल्याचे तक्रारीत म्हणण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.