ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात मुंबईत 27393 जणांवर गुन्हे दाखल

20 मार्च ते 5 जुलै या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 13022 प्रकरणात तब्बल 27393 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 3342 फरार आरोपींचा शोध घेत असून तब्बल 8675 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे, तर 15376 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडले आहे.

mumbai corona update  crime in lockdown  lockdown fir  mumbai latest news  मुंबई कोरोना अपडेट  मुंबई लेटेस्ट न्यूज  लॉकडाऊनमधील गुन्हेगारी
लॉकडाऊन काळात मुंबईत 27393 जणांवर गुन्हे दाखल
author img

By

Published : Jul 6, 2020, 11:53 AM IST

मुंबई - कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईत प्रशासकीय स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊन हा 30 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या 3653 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

20 मार्च ते 5 जुलै या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्याच्या 13022 प्रकरणात तब्बल 27393 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 3342 फरार आरोपींचा शोध घेत असून तब्बल 8675 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे, तर 15376 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडले आहे.

लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1311 गुन्हे दाखल करण्यात आले असून, मध्य मुंबईत 2364 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पूर्व मुंबईत तब्बल 2323 गुन्हे दाखल झाले आहेत, तर पश्चिम मुंबईत 2240, उत्तर मुंबईत 4784 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

गेल्या 24 तासात पोलिसांनी मुंबईत 175 गुन्हे कलम 188 नुसार नोंदविले असून यात सर्वाधिक 112 गुन्हे उत्तर मुंबईत नोंदविण्यात आले आहेत. या खालोखाल दक्षिण मुंबईत 9 गुन्हे, मध्य मुंबईत 18, पूर्व मुंबईत 25, पश्चिम मुंबईत 11, अशा गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.