मुंबई FIR Against Udhayanidhi Stalin : सनातन धर्मावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर मुंबईतील मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता उदयनिधी स्टॅलिन यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे.
-
Maharashtra | An FIR has been registered against DMK leader and Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin over his 'Sanatan Dharma' remark. Police have registered a case under sections 153 A and 295 A of IPC: Mira Road Police
— ANI (@ANI) September 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | An FIR has been registered against DMK leader and Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin over his 'Sanatan Dharma' remark. Police have registered a case under sections 153 A and 295 A of IPC: Mira Road Police
— ANI (@ANI) September 12, 2023Maharashtra | An FIR has been registered against DMK leader and Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin over his 'Sanatan Dharma' remark. Police have registered a case under sections 153 A and 295 A of IPC: Mira Road Police
— ANI (@ANI) September 12, 2023
मिरा रोड पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम 153 अ, 295 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह टीका केली होती. सनातन धर्म हा मच्छर, डेंग्यूसारखा आहे. त्यामुळे सनातन धर्म संपवला पाहिजे असं, वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. उदयनिधी स्टॅलिन यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानं देशभरात खळबळ उडाली होती. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता मुंबईतही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं उदयनिधी स्टॅलिन यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
हेही वाचा :