ETV Bharat / state

२४ हजार फेरीवाल्यांकडून ३ कोटीपेक्षा अधिक दंड वसूल; मध्य रेल्वेची कारवाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 4:59 PM IST

Fine On Railway Hawkers : मागील 8 महिन्यात मध्य रेल्वेनं 24 हजार फेरीवाल्यांवर कारवाई केलीय. (Central Railway Division) त्यांच्याकडून 3.05 कोटी एवढा दंड वसूल केला आहे. रेल्वे गाड्यात आणि रेल्वे परिसरातील (Action by Central Railway) अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Fine On Railway Hawkers
आरपीएफ

मुंबई Fine On Railway Hawkers : एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 144 अंतर्गत 24,339 फेरीवाल्यांवर गुन्हे नोंदवले (Action against hawkers) असून 24,334 फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. तसंच या फेरीवाल्यांकडून 3.05 कोटी रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या, रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात (Railway Protection Force) अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरुध्द अत्यंत यशस्वी मोहीम राबवली असल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितलं.

कुठे किती दंड वसूल? मध्य रेल्वेनं राज्यातील मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर या विभागात फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई केली आहे. एकट्या मुंबई विभागात 9394 गुन्ह्यांची नोंद झाली असून 9393 जणांना अटक करून एकूण 1.02 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. भुसावळ विभागांमध्ये 7206 गुन्हे दाखल असून 7205 फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. तर 1.29 कोटी रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. नागपूर विभागात 3181 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 3179 जणांना अटक करण्यात आली असून 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाईचा धडाका सुरूच राहणार : पुणे विभागात 1990 गुन्हे दाखल करण्यात आले आणि 1991 लोकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 13.88 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर सोलापूर विभागात 2568 गुन्हे दाखल करण्यात आले. 2566 लोकांना अटक करण्यात आली असून, 25.87 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच आगामी काळात देखील ही कारवाईची मोहीम राबविण्यात येईल, असं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितले आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यातील कारवाई : एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 144 अंतर्गत 24,339 फेरीवाल्यांवर गुन्हे नोंदवले असून 24,334 फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या फेरीवाल्यांकडून 3.05 कोटी रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

  1. युवा शेतकऱ्यानं एका गुंठ्यात घेतलं 3 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन, जाणून घ्या काय केल्या उपाययोजना
  2. भारत जोडोनंतर आता राहुल गांधींची 'भारत न्याय यात्रा'; कॉंग्रेस फुंकणार लोकसभेचं रणशिंग
  3. साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात, कर्नाटकातील चार भाविकांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.