ETV Bharat / state

BEST Financial Loss : बेस्टची तूट काही कमी होईना, प्रवाशांना सोयी सुविधा देताना अडचणी येण्याची शक्यता - बेस्ट सेवा आर्थिक संकटात

मुंबई परिवहन बेस्टचे आर्थिक नुकसान ( Financial loss of Mumbai Transport BEST ) सोसावे लागत आहे. मुंबई महापालिकेने बेस्टला आर्थिक ( Municipal financial assistance to BEST ) मदत देऊनसुद्धा बेस्ट सेवा आर्थिक संकटात सापडली ( Best service in financial crisis ) आहे.

BEST  Financial Loss
बेस्टची तूट
author img

By

Published : Dec 2, 2022, 5:15 PM IST

मुंबई - मुंबईकर प्रवासी प्रवासासाठी रेल्वे, बसचा वापर करतात. बेस्टचा परिवहन उपक्रम आर्थिक संकटात ( BEST transportation business is in financial trouble ) आहे. दोन वर्षांपूर्वी बेस्टने खासगी बसेस ( BEST ) सुरु करताना त्यामुळे आर्थिक तूट कमी होईल असे जाहीर केले होते. मात्र बेस्टकडून अर्थसंकल्प ( Budget from BEST ) सादर करताना अशी तूट कमी झाल्याचे दिसून येत नाही.

पालिकेनची बेस्टला आर्थिक मदत - बेस्टची तूट कमी होत नसल्याने असेच सुरु राहिल्यास पुढे प्रवाशांना चांगल्या सुविधा देताना अडचणी निर्माण ( Financial loss of Mumbai Transport BEST ) होतील. यामुळे पालिकेने बेस्टला आर्थिक मदत ( Municipal financial assistance to BEST ) करूनही तूट कमी होत असल्याने आणखी मुंबईकर करदात्या नागरिकांचा पैसा बेस्टला द्यायचा असा सवाल माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. तर येत्या चार वर्षात सर्व तूट भरून येईल असा खुलासा बेस्टकडून करण्यात आला आहे.

बेस्टची तूट काही कमी होईना - मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. बेस्ट आर्थिक अडचणीत असल्याने पालिकेने बेस्टला कृती आराखडा बनवून दिला आहे. त्यानुसार बेस्टला आपला खर्च कमी करावा, खासगी भाडेतत्वावर बसेस चालवाव्यात आदी सूचना करण्यात आल्या आहेत. या सुधारणांच्या अटीवर पालिकेने बेस्टला ५ हजार कोटींहून अधिकची आर्थिक मदत केली आहे. खासगी बसेस सुरु करताना बेस्टला आर्थिक मदत करताना एक अहवाल देण्यात आला होता.

८०० कोटी रुपयांची तूट कमी होईल - त्यानुसार खासगी बसेस आल्यावर ८०० कोटी रुपयांची तूट कमी होईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्ष मात्र अर्थसंकल्पात अशी तूट कमी झाल्याचे दिसून आलेले नाही. बेस्टने २०२२ - २३ च्या अर्थसंकल्पात २२३६.४८ कोटींची तर २०२३ - २४ मध्ये यात किंचित घट होऊन २००० कोटींची तूट दाखवण्यात आली आहे.

तर निधी देण्याचे बंद करावे - बेस्ट उपक्रमात गेल्या काही वर्षात कामगार भरती झालेली नाही. मुंबई महानगर पालिका दरवर्षी बेस्टला १५०० कोटी रुपये देत आहे. मुंबईची लोकसंख्या पाहता बेस्टकडे सध्या १० हजार बसेस असणे आवश्यक आहे. पण बेस्टच्या ताफ्यात स्वतःच्या ३३२७ बस राहतील असा सामंजस्य करार झालेला असताना केवळ १८०० बसेस आहेत. असे असताना बेस्टची तूट कमी व्हायला हवी होती. दरवर्षी वाढते कशी असा सवाल माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

पालिकेने निधी देण्याचे बंद करावे - बेस्ट समिती होती तेव्हा त्यावर नियंत्रण होते आता समिती नसल्याने असे घडत आहे. बेस्टला आर्थिक मदत केली पाहिजे, मात्र निधी दिल्यानंतरही तूट कमी होताना दिसत नाही. मुंबईकर नागरिकांचा कर रूपाने जमा केलेला पैसा बेस्टला मदत म्हणून दिला गेला आहे. हा निधी देऊनही तूट कमी होत नसल्यास पालिकेने निधी देण्याचे बंद करावे असे आवाहन रवी राजा यांनी केले आहे.

४ वर्षात तूट भरून निघेल - १ लाख लोकसंख्येसाठी ६० बसेस हव्या आहेत. बेस्टकडे सध्या १ लाख लोकसंख्येसाठी २२ बसेस आहेत. बेस्ट कंत्राटदाराकडून खासगी भाडेतत्वावर बसेस चालवत आहेत. तूट कमी होत आहे. येत्या चार वर्षात बेस्टकडे १० हजार बसेस असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रीमियम बस सेवा, चलो अँप, टॅप ऑन टॅप ऑफ, डबल डेकर बसेस, इलेकट्रीक बस आदी सेवा दिल्या जात आहेत. सध्या बेस्टने ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात वाढ होऊन ४५ लाख प्रवासी होतील. प्रवाशांची संख्या वाढल्याने पुढील ४ वर्षात तूट भरून निघेल अशी प्रतिक्रिया बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्र यांनी दिली आहे.

बेस्ट आर्थिक संकटात - बेस्ट उपक्रमाकडे काही वर्षांपूर्वी स्वतःच्या मालकीच्या ४ हजाराहून अधिक बसेसचा ताफा होता. बससाठी लागणारे डिझेल आणि त्यावर होणार परिरक्षणाचा खर्च मोठा होता. यामुळे बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग आर्थिक अडचणीत आला. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बेस्टने बँकांकडून कर्ज घेतले. मात्र नंतर बँकांनी कर्ज देणे बंद केले. यामुळे पालिकेने बेस्टला १६०० कोटींचे कर्ज दिले होते.

बेस्टवर कर्जाचा डोंगर - या कर्जाची परतफेड बेस्टने केली. या दरम्यान बेस्टवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पालिकेने कृती आराखडा बनवून दिला. त्यात बेस्टच्या बसेस खासगी कंत्राटदाराकडून चालवण्याचा सल्ला देण्यात आला. यानुसार बेस्टने आपला बसचा ताफा कमी करण्यास सुरुवात केली आहे. बेस्टने २०२२ - २३ या आर्थिक वर्षात २२३६ कोटींची तूट दाखवली आहे. बेस्टला एकूण ९ हजार कोटी रुपयांचा तोटा आहे. पालिकेने २०१५ पासून आतापर्यंत बेस्टला ५३०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

बेस्टची आर्थिक तूट -
२०२२ - २३ - २२३६ कोटी रुपये
२०२३ - २४ - २००१ कोटी रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.