ETV Bharat / state

Final voter list : अंतिम मतदार याद्या तयार, असुरक्षित आदिवासींचाही शंभर टक्के समावेश

author img

By

Published : Jan 5, 2023, 5:14 PM IST

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांची अंतिम यादी तयार झाल्याची घोषणा (Final voter lists ready) आज केली आहे. यानुसार राज्यात युवा दिव्यांग महिला तसेच देहविक्री करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीय यांचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. असुरक्षित आदिवासी गट प्रवर्गातील पात्र व्यक्तींचे 100% नोंदणीकरण करण्याबाबत (100 percent inclusion of vulnerable tribals too) निर्देश दिले होते. त्याप्रमाणे शंभर टक्के नोंदणी केल्याबाबत संबंधित जिल्ह्यांनी प्रमाणित केले असल्याचेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

Final voter list
अंतिम मतदार याद्या तयार

मुंबई : निवडणूक आयोगामार्फत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे. सुधारणा मतदार यादी करून नऊ नोव्हेंबर 2022 रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात (Final voter lists ready) आली होती. या प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. या सर्व दावे आणि हरकती यांचा निकाल 26 डिसेंबर 2022 पर्यंत लावण्यात आला. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज अंतिम मतदार यादी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध केल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी दिली.

शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते : विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीत युवा मतदारांनी तसेच दिव्यांग महिला देहविक्री करणाऱ्या महिला तृतीयपंथीय व्यक्ती आणि विमुक्त भटक्या जमातीमधील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, याकरिता विषय शिबिरांचे आयोजन राज्य सरकार तर्फे करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचही त्यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेषत: असुरक्षित आदिवासी गट प्रवर्गातील पात्र व्यक्तींचे 100% नोंदणीकरण करण्याबाबत (100 percent inclusion of vulnerable tribals too) निर्देश दिले होते. त्याप्रमाणे शंभर टक्के नोंदणी केल्याबाबत संबंधित जिल्ह्यांनी प्रमाणित केले असल्याचेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

अंतिम मतदार यादीतील आकडेवारी? : राज्यातील मतदारांच्या अंतिम यादीनुसार आता राज्यात नऊ कोटी 2 लाख 85 हजार 801 एवढी मतदारांची संख्या आहे. यामध्ये चार कोटी 71 लाख 35 हजार 999 इतके पुरुष तर चार कोटी 31 लाख 45 हजार 67 इतक्या महिला मतदारांची संख्या आहे. 4735 ही तृतीयपंथीय मतदारांची संख्या असणार आहे. मतदार यादी नव्याने तयार करण्यात आल्यानंतर पुरुषांच्या मतदारसंघात एक लाख 52 हजार 254 इतकी वाढ झाली. महिलांच्या संख्येत एक लाख सहा हजार 287 इतकी तर 90 तृतीयपंथीय मतदारांमध्ये वाढ झाल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

मतदारांची संख्या : 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या आठ लाख 35 हजार 833 इतकी आहे. 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या एक कोटी 70 लाख 22 हजार 527 इतकी आहे. तीस ते 39 वयोगटातील मतदारांची संख्या दोन कोटी नऊ लाख 62 हजार 154 इतकी आहे. 40 ते 49 वयोगटातील मतदारांची संख्या एक कोटी 98 लाख 51 हजार 337 इतकी आहे. 50 ते 59 वयोगटातील मतदारांची संख्या एक कोटी 48 लाख 44 हजार 363 इतकी आहे. 60 ते 69 वयोगटातील मतदारांची संख्या 94 लाख 83 हजार 432 इतकी आहे. 70 ते 79 वयोगटातील मतदारांची संख्या 52 लाख 32 हजार 929 इतकी आहे. तर 80 वर्षावरील मतदारांची संख्या 31 लाख 9853 इतकी असल्याची माहिती देशपांडे यांनी यावेळी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.