ETV Bharat / state

सुशांतसिंह प्रकरण : ..म्हणून सुशांतच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करा - रिया चक्रवर्ती - रिया चक्रवर्ती एनसीबी चौकशी

रिया चक्रवर्ती हिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर तरुण कुमार यांच्या चिट्ठीवरुन सुशांत सिंगला एनडीपीएस अंतर्गत बंदी घालण्यात आलेली औषध देण्यात आली. डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडे सुशांत कुठल्याही प्रकारचे उपचार घेत नसतानाही औषधांची प्रिस्क्रिप्शन सुशांतला देण्यात आल्याचा आरोप रिया चक्रवर्ती हिने केला आहे.

rhea chakraborty (file photo)
रिया चक्रवर्ती (संग्रहित)
author img

By

Published : Sep 7, 2020, 10:49 PM IST

मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून तपास केला जात आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती हिने सुशांत सिंहची बहीण प्रियांका सिंह आणि डॉ. तरुण कुमार हिच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर सोमवारी एनसीबी चौकशी संपवून थेट बांद्रा पोलीस ठाणें गाठले. जर सुशांतच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन माझ्या विरोधात गुन्हा दाखल होत असेल तर सुशांतची बहिण प्रियांका सिंग हिच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, म्हणून रिया चक्रवर्ती हिने बांद्रा पोलिसांकडे मागणी केलेली आहे.

रियाने तिच्या तक्रारीत काय म्हटले?

रिया चक्रवर्ती हिने तिच्या तक्रारीत म्हटले आहे, राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे हृदयविकार तज्ञ डॉक्टर तरुण कुमार यांच्या चिट्ठीवरुन सुशांत सिंगला एनडीपीएस अंतर्गत बंदी घालण्यात आलेली औषध देण्यात आली. डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडे सुशांत कुठल्याही प्रकारचे उपचार घेत नसतानाही औषधांची प्रिस्क्रिप्शन सुशांतला देण्यात आल्याचा आरोप रिया चक्रवर्ती हिने केला आहे. तसेच डॉक्टर तरुण कुमार यांनी जी औषध दिली आहेत, ती मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या टेलीमेडिसीन गाईडलाईन नुसार योग्य नव्हती, असा आरोपही तिने केला.

दरम्यान, 8 जून 2020 ला रिया चक्रवर्ती ही सुशांतसिंह याच्या सोबत होती. यावेळी सुशांत हा त्याच्या मोबाईल फोनवर सतत मेसेज करत होता. त्यावेळेस रिया चक्रवर्तीने तू कोणाला मेसेज करतो, असे विचारले असता त्याने त्याच्या मोबाईल फोनवर त्याच्या बहिणीने पाठवलेला मेसेज दाखवला. यामध्ये प्रियांका सिंह हिने सुशांतला काही औषधांची यादी पाठवलेली होती. त्यात औषध सुशांतने घ्यावीत, असे म्हटले होते.

यादरम्यान, सुशांतला रियाने समजावून सांगितलं होते, सध्या त्याच्यावर वेगळ्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेली औषधे सोडून इतर कुठलीही औषधे त्याने घेऊ नयेत. मात्र, असे सांगूनही सुशांत याने त्याची बहीण प्रियांका सिंह हिने सांगितलेली औषधे घेणार असल्याचे रियाला सांगितले होते. तसेच रियाने घरातून निघून जावे, कारण सुशांतची बहिण मीतु सिंग ही त्याची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी राहायला येत असल्याचे सांगितले. यानंतर रिया त्याच्या घरातून निघून गेली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.