ETV Bharat / state

Sachin Ahir On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हे यांच्या मुद्द्यावर न्याय मिळेपर्यंत लढणार - सचिन अहिर - नीलम गोऱ्हे

विधान परिषदेत आज पहिल्याच दिवशी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अपात्र करण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला. गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यानंतर त्या या पदासाठी पात्र नसून त्यांना अपात्र करण्यात यावे, असे पत्र उबाठा गटाकडून विधिमंडळ सचिवांना देण्यात आले आहे. याच मुद्द्यावरून आज सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला.

Sachin Ahir On Neelam Gorhe
सचिन अहिर
author img

By

Published : Jul 17, 2023, 6:22 PM IST

नीलम गोऱ्हे पात्रता प्रकरणी सचिन अहिर यांची प्रतिक्रिया

मुंबई : आमदार सचिन अहिर म्हणाले आहेत की, उपसभापती नीलम गोऱ्हे यांना निलंबित करणे महत्त्वाचे होते. त्यांची नेमणूक ही उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या गटाकडून करण्यात आली होती. त्यांनी पक्षांतर केल्यानंतर निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना त्या पदावर बसता येत नाही. यापुढे सुद्धा आमची लढाई चालू असेल. आम्ही सचिवांना पत्र दिले आहे. त्यानंतर आम्ही राज्यपालांना भेटू व गरज पडल्यास आम्ही न्यायालयातही जाऊ, असे सचिन अहिर म्हणाले आहेत.

नैतिक दृष्ट्या अधिकार नाही : या प्रश्नावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले आहेत की, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस दिली असल्या कारणाने त्या कामकाज करू शकत नाहीत. नैतिक दृष्ट्या त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. उपसभापती नीलम गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे, आमदार विप्लव बाजोरिया यांना अपात्र करण्यासाठी विधिमंडळ सचिवांना पत्र देण्यात आले आहे.

सभागृहाला वेठीस धरता येणार नाही : तर दुसरीकडे विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपाबाबत सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, विरोधक बेकायदेशीररीत्या हा मुद्दा उपस्थित करून सभागृहाला वेठीस धरण्याचे काम करत आहेत; पण अशा प्रकारे सभागृहाला वेठीस धरता येणार नाही. अतिशय गांभिर्याचा असा प्रस्ताव असताना अशा पद्धतीने सभागृहाला वेठीस धरणे अत्यंत चुकीचे आहे.

शिवसेना पक्षाच्या निष्ठावंत नेत्या : महाराष्ट्र विधिमंडळाच्या 55 वर्षानंतर विधान परिषद उपसभापती पदावर एका महिलेला स्थान मिळाले आहे. 2004 सालापासून आजपर्यंतच्या विधान परिषद सदस्य म्हणून नीलम गोऱ्हे या कार्यरत आहेत. 2019 पासून त्या विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून काम पाहत आहेत. शिवसेना पक्षाच्या निष्ठावंत नेत्या, शिवसेना पक्षाच्या प्रवक्ता म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाची खंबीर बाजू नीलम गोऱ्हे यांनी लावून धरलेली होती.

नीलम गोऱ्हे पक्षाशी एकनिष्ठ : नीलम गोऱ्हे या शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत एकनिष्ठ आहेत. त्या असा विचार करतील असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर थोड्याच वेळात नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या शिंदे गटात जाण्याने विधान परिषदेतील शिंदे गटाच्या आमदारांची संख्या तीन झाली आहे. आगामी काळात ठाकरे गटातील कोणकोणते आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा:

  1. Rohit Pawar : विधानसभा विरोधी पक्षनेता निवड; आमदार रोहित पवारांनी केली 'ही' मागणी
  2. NCP Political Crisis: राष्ट्रवादीत हाय होल्टेज ड्रामा; अजित पवारांसह बंडखोर आमदारांची शरद पवारांसोबत चर्चा
  3. Maharashtra Monsoon Session : नव्या संदर्भात नीलम गोऱ्हेंच्या उपसभापतीपदावर विरोधकांचा आक्षेप, विरोधकांचा सभात्याग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.