ETV Bharat / state

किटकनाशक व खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट, 'वंचित'चा आरोप

आपल्याकडे ५ कृषी विद्यापीठे असली तरी त्यात खत तपास करण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे, पीक आले नाही, अशी नेहमी शेतकऱ्यांची तक्रार असते. राज्यात बहुतांश मंत्री, आमदार हे शेतकऱ्यांची पोरं आहेत. पण तरीही परिस्थिती उदासीन असल्याचे दिसत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Aug 26, 2020, 8:32 PM IST

मुंबई- किटकनाशक तयार केल्यावर त्यावर नियंत्रण आणणारे कायदे आहेत. कोणीही तक्रार केली तर किटकनाशक आणि खत तपासण्यासाठी राज्यात एकही लॅब नाही. हा तपास हरियाणात होतो, आणि तेथून सकारात्मक निकाल येतो. जेनेरिक औषधांप्रमाणे जेनेरिक किटकनाशक तयार करण्यासाठी सरकार परवानगी देत नाही. जास्तीस जास्त माल हा कच्या पावतीवर विकला जातो. त्यामुळे त्याला दावा ठोकता येत नाही. परिणामी राज्याला १२ हजार कोटींचे नुकसान होत आहे. आता न्यायालयाकडून शासनाला लॅब उभारण्यासाठी मजबूर करू. याबाबत मला सरकारकडून अपेक्षा नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

माहिती देताना चित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

ही कारखाने राजकीय नेत्यांची आहेत. यात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे, असे मी मानतो. आपल्याकडे ५ कृषी विद्यापीठे असली तरी त्यात खत तपास करण्याची यंत्रणा नाही. त्यामुळे, पीक आले नाही, अशी नेहमी शेतकऱ्यांची तक्रार असते. राज्यात बहुतांश मंत्री, आमदार हे शेतकऱ्यांची पोरं आहेत. पण तरीही परिस्थिती उदासीन असल्याचे दिसत आहे. सरकारने फर्टिलायझर तपासण्यासाठी लॅब उभाराव्यात. कृषी संचालकांनी संबधित्यांना ते उत्पादन तपासून घेण्यास सांगितले पाहिजे. त्यानुसार किंमत ठरवता येईल. त्यामुळे, ३ हजाराची वस्तू शेतकऱ्याला १ हजाराला मिळू शकेल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

डीलर्सचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी लागेबांधे आहेत. हे सरकार रडत पडत का असेना पण, ५ वर्ष टिकेल, असे वाटते. काहीतरी मोठे घडले नाही तर सरकार टिकेल. सुशांत हा चांगला अभिनेता होता. मात्र, काही ठोस कारण कळत नाही तोपर्यंत यावर बोलता येणार नाही. ड्रग संदर्भात देखील सीबीआयने योग्य तपास करावा. सीबीआयने अजून अहवाल दिला नाही. त्यामुळे, हे सगळे काल्पनिक असल्यासारखे वाटत आहे. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

तसेच, पंढरपुरातील नागरिकांना मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी. यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. कोरोनाचे नाटक फार काळ चालणार नाही. कोरोनाच्या नावाखील सरकारने अनेक विषयांकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने पाऊस पूर या सारख्या विषयांवर लक्ष घालावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्याचबरोबर, पुण्यात रुग्ण संख्या कमी झाल्यावर जम्बो सेंटर उभारली. खासगी रुग्णालये, शासकीय रुग्णालये असताना सरकारने सेंटर्स का उघडली? असा प्रश्न करत यात अनेकांनी हात धुवून घेतल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

सरकारने छोटे व्यावसायिक आणि मच्छीमारांना अनुदान द्यायला हवे होते. लॉकडाऊन शिथिल करण्याएवजी नियम घट्ट करण्यात आले. ठाकरे सरकार हे मोदी सरकारसारखे वागत आहे. नवरा बायकोला एकत्र राहण्यास परवानगी आहे, मात्र दुचाकीवरून सोबत जायाला परवानगी नाही. आता यावर काय बोलायचे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. तसेच, मोदी एकटे राहतात. ठाकरे आपल्या कुटुंबासोबत राहतात. लोकांच्या वैयक्तिक गोंष्टींवर सरकारने नियंत्रण आणू नये, असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

हेही वाचा- कोरोनाच्या तीन अत्यावस्थ रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.