ETV Bharat / state

सोशल डिस्टन्सिंग पाळून महिला गोविंदांनी फोडली दहीहंडी

author img

By

Published : Aug 12, 2020, 2:49 PM IST

दहीहंडी म्हटलं की मुंबई, ठाणे तसेच इतर शहरात उंच-उंच थर लावताना बालगोपाल दिसतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र दहीकाला उत्सव रद्द झाले आहेत. विलेपार्लेच्या पार्ले स्पोर्ट्स क्लब या महिलांच्या गोविंदा पथकाने सोशल डिस्टन्सिंग पाळत दहीहंडी फोडली.

Dahi handi
दहीहंडी

मुंबई - दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर सर्वत्र दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहीहंडी म्हटलं की मुंबई, ठाणे तसेच इतर शहरात उंच-उंच थर लावताना बालगोपाल दिसतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र दहीकाला उत्सव रद्द झाले आहेत. विलेपार्लेच्या पार्ले स्पोर्ट्स क्लब महिलांच्या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. उत्सव आणि आपली परंपरा व संस्कृती जपण्यासाठी या महिला व मुलींनी सोशल डिस्टंन्सिंग पाळत दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला.

पार्ले स्पोर्ट्स क्लब या महिलांच्या गोविंदा पथकाने सोशल डिस्टन्सिंग पाळत दहीहंडी फोडली

दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा मिळाला आहे. त्यानंतर गेल्या वर्षी सरकारने काही अटी व नियम लागू केल्याने अनेक बाळ गोपाळ व गोपिकांना दहीहंडीच्या थरार खेळातून मागे यावे लागले होते. यंदा तर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात उत्सवही साजरा झाला नाही. मात्र, यावरही तोडगा काढत सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करत दहीहंडी उत्सव साजरा केल्याचे, पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी गोविंदा पथकाच्या अध्यक्षा गीता झगडे यांनी सांगितले.

यंदाचे आमचे 20वे वर्ष आहे. मात्र कोरोनामुळे आमचा सात थर लावण्याचा सराव यंदा करता आला नाही. मात्र, पुढच्या वर्षी जोमाने सराव करून आम्ही सात थर लावून आमचा रेकॉर्ड कायम ठेवू, असेही गीता झगडे म्हणाल्या.

दरम्यान, सर्वात मोठ्या दहीहंडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दादरमध्ये यंदा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सर्व आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.