ETV Bharat / state

'माझा हिरा हरवलाये; दिव्यांश लवकर सापडला नाही, तर रस्ता 'ब्लॉक' करेल' - drainage

पालिकेच्या निष्काळजीपणा विरोधात गुन्हा दाखल करणार असून ही लढाई शेवटपर्यंत लढणार असल्याचे नाल्यात पडलेल्या दिव्यांशचे वडील सुरज सिंग म्हणाले.

रास्ता रोको
author img

By

Published : Jul 11, 2019, 2:00 PM IST

Updated : Jul 11, 2019, 3:22 PM IST

मुंबई - माझा हिऱ्यासारख्या मुलगा हरवला आहे. पालिकेने माझ्या मुलाला लवकर शोधावे, अन्यथा मी रस्ता अडवून धरेल, असा इशारा नाल्यात पडलेल्या दिव्यांश सिंगचे वडील सूरज सिंग यांनी दिला आहे. १३ तास उलटूनही दिव्यांश सापडत नसल्याने त्याच्या कुंटुबीयांचा आक्रोश सुरू आहे.

दिव्यांशच्या वडीलांचा रास्ता रोकाचा इशारा

मुलाचे वडील सूरज सिंग, नातेवाईक आणि स्थानिकांनी गोरेगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या विरवानी रस्त्यावर रास्ता रोको केला. मुलगा मिळत नाही तोपर्यंत रस्ता अडवून ठाण मांडणाऱ्या दिव्यांशचे वडील सूरज सिंग व पाच नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दिव्यांशचे वडील सूरज सिंग व पाच नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मी रात्री मुलासोबत वेळ घालवून घराबाहेर पडलो. मात्र, मला पाहण्यासाठी दिव्यांश बाहेर आला होता. त्याच्या पाठी त्याची आईही धावत आली. पण, अवघ्या १५ सेकंदात तो नाल्यात पडल्याचे सिंग यांनी सांगितले. पालिकेच्या निष्काळजीपणा विरोधात आपण गुन्हा दाखल करणार आहोत. तसेच ही लढाई आपण शेवटपर्यंत लढणार आहोत, असेही सिंग म्हणाले.

काय घडले -
गोरेगावच्या आंबेडकरनगर मध्ये बुधवारी मुसळधार पाऊस सुरू होता. पावसामुळे गटार मोठ्या प्रवाहाने वाहत होते. दरम्यान, हा चिमुकला रात्रीच्या सुमारास घराबाहेर आला आणि चुकून उघड्या गटारात पडला. गटारातील पाणी जोराने वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहासोबतच तो वाहून गेला.

घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यानंतर पोलीस, अग्निशामक दल आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या चिमुकल्याचा शोध सुरू केला. गेल्या १३ तासांपासून बचाव पथकाकडून या मुलाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. या घटनेला पालिकाच जबाबदार असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Intro:मी माझा हिरा मुलगा हरवला आहे, पालिकेने माझ्या मुलाला लवकर शोधावे अन्यथा मी रस्ता ब्लॉक करेल असा इशारा दिव्यांश चे वडील सूरज सिंग यांनी दिला आहे.

Body:मी रात्री काही वेळ त्याच्या सोबत घालवून घराबाहेर पडलो, मला बघण्यासाठी तो बाहेर आला होता,त्याच्या पाठी त्याची आई धावत आली, अवघ्या 15 सेकंदात तो नाल्यात पडल्याचे सिंग यांनी सांगितले.

Conclusion:पालिकेच्या निष्काळजीपणा विरोधात गुन्हा दाखल करणार असून ही लढाई शेवटपर्यंत लढणार असल्याचे सिंग म्हणाले.
Last Updated : Jul 11, 2019, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.