ETV Bharat / state

Mumbai HC On Child Keeping: वडिलांनी आईला संपवलं; मुलाला मामाकडे ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

अकरा वर्षाचा मुलगा तो आजी आणि आजोबाकडे राहत होता आणि आजी आजोबाकडे राहण्याचा खालच्या न्यायालयाचा निर्णय होता; परंतु दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मुलाच्या मामाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द करत वडिलांनीच आईला संपल्यामुळे भाच्याने मामाकडे राहण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने केला.

Mumbai HC On Child Keeping
उच्च न्यायालयाचा निर्णय
author img

By

Published : May 12, 2023, 10:46 PM IST

मुंबई: अकरा वर्षाचा मुलगा आई-वडिलांसह राहत होता. आई आणि वडिलांचे भांडण झाले. वडिलांनी आईची हत्या केली. परंतु त्यावेळेला हा अकरा वर्षाचा मुलगा समोर होता आणि त्यानेच दिवाणी न्यायालयामध्ये बापाच्या विरुद्ध साक्ष दिली होती. वडिलांनीच आईला संपवलं होतं. त्यामुळे आजी-आजोबाकडे अकरा वर्षाचा नातू राहत होता. परंतु आजी आणि आजोबा हे वयाना आता थकलेले होते. त्यामुळे ते फार काही अधिक सांभाळ करू शकत नव्हते. असा दावा लहान मुलाच्या मामांना याचिकेमध्ये उच्च न्यायालयात केला. परंतु, दिवाणी न्यायालयाने वृद्ध आजी-आजोबांकडे नातवाला राहू द्यावा, असा निर्णय दिला होता; परंतु उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द करत 11 वर्षाच्या मुलाला त्याच्या मामाकडे राहू द्यावा, असा निर्णय दिला.

संशयातून पत्नीची हत्या: अकरा वर्षाच्या या मुलाचा बाप हा व्यवसायाने डॉक्टर होता. त्याचा दातांचा दवाखाना होता पत्नी ही बहुश्रुत होती. अनेकांसोबत संवाद असायचा. त्यामुळे डॉक्टर नवऱ्याला बायकोवर संशय होता. तिचे कोणाशी तरी बाहेर प्रेम प्रकरण असल्याचा त्याचा निव्वळ संशय होता. त्यामुळे त्या मुद्द्यावरून तो तिच्याशी भांडत असायचा. याचा परिणाम लहान मुलावर झाला होता. परंतु बापाने एके दिवशी जोरात भांडण केलं आणि रागात पत्नीलाच घरामध्ये मुलाच्या देखत संपवले. मुलाच्या मनावर याचा मोठा परिणाम झाला. कारण त्यावेळी मुलाचं वय केवळ साडेतीन वर्षाचे होते आणि ही घटना 11 डिसेंबर 2016 रोजी घडली होती.

मामाचे दिवाणी न्यायालयाला आवाहन: मुलगा आता 2023 मध्ये 11 वर्षाचा झाला. परंतु त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यामुळे तो सैरभैर देखील होत असायचा. त्यावेळेला दिवाणी न्यायालयाने त्याची जी आजी आजोबा होते. त्यांच्याकडे राहण्याचा निर्णय दिला. परंतु आजी-आजोबा हे वृद्ध आहे एका मर्यादेच्या पलीकडे ते त्याचा फार काही नियमितपणे सांभाळ करू शकत नाही. दिवाणी न्यायालयातून खटला उच्च न्यायालयात गेला. कारण मुलाच्या मामानं शहर दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

भाच्याला मामाकडे ठेवण्याचा निर्णय: उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेला यासंदर्भात खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळेला न्यायमूर्तींनी लहानग्या बाळालाच विचारले की तुला कोणासोबत राहायला आवडेल? त्याने त्याच्या वडिलांच्या आईकडे म्हणजे आजीकडे बोट दाखवलं. त्यामुळे सर्वांचाच असा समज झाला की त्याला आजीकडेच कायमचा राहायचे. न्यायालयाचे निरीक्षण होते की त्याने आजीकडे बोट दाखवले म्हणून त्याला कायमचे आणि सदोतीतच आजीकडे राहायचे असा त्याचा अर्थ नाही. मात्र आजीकडे तो जाऊ येऊ शकतो. परंतु मामाने केलेली मूळ मागणी आणि मामा त्याच संगोपन आता करत आहे. आणि मामा त्याचे यापुढे देखील आयुष्यभर संगोपन करण्यास सक्षम आहे. याची खात्री आहे. त्यामुळे मामाकडेच भाच्याला ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय दिला.

हेही वाचा:

  1. Narvekar On MLAs Disqualification : 'त्या' आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही : राहुल नार्वेकर
  2. CBI Raid On Sameer Wankhede House : समीर वानखेडे यांच्या घरावर 'सीबीआय'ची छापेमारी, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
  3. Param Bir Singh : माजी गृहमंत्र्यांना तुरुंगात पाठवणारे परमबीर सिंह 'या' प्रकरणामुळे आले होते चर्चेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.