ETV Bharat / state

फास्टटॅगचा 26 जानेवारीचा मुहूर्त काहीसा पुढे जाणार! - MSRDC on FASTag implementation

केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून देशभर 100 टक्के फास्टटॅग अनिवार्य केले आहे. पण कुठल्याही यंत्रणेची यादृष्टीने तयारी पूर्ण झालेली नाही.

टोल संकलन
टोल संकलन
author img

By

Published : Jan 1, 2021, 9:41 PM IST

मुंबई - केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यात फास्टटॅगच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. पण, पहिल्या टप्प्यात केवळ दोन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि सी लिंकवर 100 टक्के फास्टटॅग कार्यान्वित करण्यात येणार आहे. तर इतर काही ठिकाणी फास्टटॅग सुरू करण्याचा २६ जानेवारीचा मुहुर्त चुकणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात पहिल्या टप्प्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक आणि अन्य दोन ठिकाणी 26 जानेवारीला 100 टक्के फास्टटॅगची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. मात्र, हा मुहूर्त चार-पाच दिवस पुढे जाईल, असे एमएसआरडीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पण नेमकी तारीख सांगण्यास नकार दिला आहे.

वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी फास्टटॅग बंधनकारक
देशभरातील टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. टोलची प्रक्रिया पूर्ण करण्याकरता बराच वेळ लागत असल्याने ही गर्दी होताना दिसत आहे. ही बाब लक्षात घेता काही महिन्यांपूर्वी केंद्राने फास्टटॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल वसुली प्रणाली बंधनकारक केली. पण ही प्रणाली राबवण्यासाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ लागणार असल्याने फास्टटॅगला मुदतवाढ दिली. दरम्यान फास्टटॅग हे स्टिकर गाडीच्या समोरील बाजूस लावल्यास या स्टिकरवर असलेल्या आरएफआयडीमार्फत ऑनलाइन टोल संकलन होते. वाहनधारकांच्या बँक खात्याशी फास्टटॅग जोडले गेलेले असते. त्यामुळे काही सेकंदात टोल भरला जातो. त्यामुळे वेळ वाचतो आणि गर्दी कमी होते, इंधन वाचते.

हेही वाचा-फास्टॅग बंधनकारक केल्याचा परिणाम; एका दिवसात ८० कोटी रुपयांचे संकलन

देशभरात 15 फेब्रुवारीपासून देशभरात फस्टटॅग अनिवार्य
केंद्र सरकारने 1 जानेवारीपासून देशभर 100 टक्के फास्टटॅग अनिवार्य केले आहे. पण कुठल्याही यंत्रणेची यादृष्टीने तयारी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे राज्यात 1 जानेवारी नव्हे तर 26 जानेवारी आणि मार्च अशा दोन टप्प्यात एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील टोलनाके 100 टक्के फास्टटॅग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास प्राधिकरणाने 15 फेब्रुवारीपासून केंद्राच्या निर्णयाची अमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर 15 फेब्रुवारीपासून फास्टटॅग अनिवार्य होणार आहे.

हेही वाचा-1 जानेवारीपासून देशातील सर्व टोल नाक्यांवर FASTag अनिवार्य

पहिल्या टप्प्यात केवळ दोन टोलवर ही प्रणाली

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही कुठेही 26 जानेवारी अशी नेमकी तारीख जाहीर केली नव्हती. पण पहिला टप्पा अखेरीस कार्यान्वित करण्यात येईल. तर यात केवळ दोनच रस्त्यांचा समावेश असेल. हा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर दुसरा टप्पा सुरू करणार आहोत. यात उर्वरित सर्व टोल नाक्यावर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. राज्यभरात फास्टटॅगची 100 टक्के अंमलबजावणी होण्यासाठी मार्च-एप्रिल उजाडणार असल्याचे म्हटले जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.