ETV Bharat / state

आता मुंबईतील पाच टोलनाक्यांवर सुरु होणार फास्टॅग मासिक पास सुविधा - मुंबई टोलनाका पास

आता फास्टॅग मध्येच मासिक पास देण्याच्या योजनेबाबत सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले की, टोलनाक्यावर प्रत्यक्ष जावून रोख रक्कम देवून मासिक पास खरेदी करण्याच्या पूर्वीच्या पध्दतीत बदल करुन त्या ऐवजी बँकेला ऑनलाइन पध्दतीने पासची रक्कम हस्तांतरण करून फास्टॅगद्वारे मासिक पास घेता येईल व फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) मधून प्रवास करता येईल व वाहनधारकांना विना थांबा टोलनाका पास करता येईल. 

फास्टॅग मासिक पास सुविधा
फास्टॅग मासिक पास सुविधा
author img

By

Published : Apr 26, 2021, 6:41 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई प्रवेश नाक्यावरील 5 टोलनाक्याचे मासिक पासधारकांना उद्यापासून (मंगळवार) फास्टॅगमध्येच मासिक पास मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली आहे. महामंडळ, आयसीआयसीआय बँक व मे. एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. (कंत्राटदार) यांच्यामध्ये झालेला करारनाम्यानुसार ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

विना थांबा टोलनाका पास

मुंबईचे प्रवेशद्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), एलबीएस मार्ग (मुलुंड) व दहिसर या टोलनाक्यावरुन मासिक पास घेवून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता फास्टॅग मध्येच मासिक पास देण्याच्या योजनेबाबत सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले की, टोलनाक्यावर प्रत्यक्ष जावून रोख रक्कम देवून मासिक पास खरेदी करण्याच्या पूर्वीच्या पध्दतीत बदल करुन त्या ऐवजी बँकेला ऑनलाइन पध्दतीने पासची रक्कम हस्तांतरण करून फास्टॅगद्वारे मासिक पास घेता येईल व फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) मधून प्रवास करता येईल व वाहनधारकांना विना थांबा टोलनाका पास करता येईल. तसेच यापुढे मासिक पास फक्त फास्टॅग असलेल्या वाहनांनाच मिळेल ज्या वाहनधारंकाकडे फास्टॅग नसेल त्यांनी प्रथम फास्टॅग घेणे आवश्यक आहे. या पद्धतीमुळे वाहन चालकांना वेळ वाचणार आहे.

असा घ्या मासिक पास

वाहनधारकासाठी ऑनलाईन पध्दतीमध्ये 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे संकेतस्थळ www.nhai.org व दुसरा पर्याय icicibankfastaglogin द्वारे मासिक पासची रक्कम बँकेस हस्तांतरण करता येते व मिळणाऱ्या पावतीवरील Authorization क्रमांक संबधित पथकर नाक्यावर 3 दिवसाचे आत जावून त्यानुसार मासिक पास कार्यान्वित (Activate) करुन घ्यावा लागेल. मुदतीत Activation न केल्यास पास आपोआप रद्द होवून तेवढी रक्कम वाहन धारकाचे खात्यात परत जमा होईल.

वाहतूक कोंडीतून मिळणार सुटका

या सुविधेमुळे साधारणपणे 22 हजार ते 25 हजार वाहनधारकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. तसेच मुंबईतील टोल नाक्यावरील गर्दीच्या वेळेची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदतच होईल. मुंबई प्रवेशद्वारावरील 4 टोलनाक्यावर दोन्ही बाजूस फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) उपलब्ध केल्यामुळे फास्टॅग वाहनधारकाची संख्या सतत वाढत असून वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होत आहे. अशी माहिती पथकर प्रशासन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फंड यांनी दिली.

लवकरच सर्व मार्गिकामध्ये फास्टॅग

राजीव गांधी सागरी सेतूवरील दोन्ही बाजुच्या सर्वच मार्गिका फास्टॅग लेनमध्ये बदलण्याचा 26 जानेवारीचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे, त्यानुसार वाशी, ऐरोली येथील पथकर नाक्यावर सर्व मार्गिका फास्टॅगमध्ये रुपांतरीत करण्याचे काम सुरु असून येत्या काही दिवसात सर्व मार्गिकामध्ये फास्टॅग यंत्रणा कार्यान्वीत होईल व त्यामुळे मुंबई नाक्यांवर वाहनधारकांना होणारा त्रास नक्कीच कमी होईल. महामंडळाकडून मुंबई प्रवेशद्वाराचे टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.