मुंबई - विकासाच्या बाबतीत शेतीचे उत्पन्न कमी आहे आणि सेवा क्षेत्राचे उत्पन्नात जास्त. याचे कारण म्हणजे शेतीतून जेवढे उत्पादन होते तितके मिळत नाही. क्षेत्रफळ जास्त असूनही लाखो शेतकरी, हजारो शेतमजूर काम करीत असूनही शेतीचा वाटा जास्त यायला हवा. पण तसे होत नाही. याला कारण मूलभूत व्यवस्था शेतीसाठी उभ्या केलेल्या नाहीत. त्यावर उपाय म्हणूनच आता शासनाने शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्र राज्य एक प्रगतिशील राज्य असून विविध प्रकारचे पिक उत्पादन केले जाते. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत चांगले दर्जेदार रस्ते, पाण्याची व्यवस्था त्यासोबतच 24 तास वीज उपलब्ध असणे हे त्याची पूर्व अट आहे. मात्र, 24 तास वीजआज आपल्या लाखो शेतकऱ्यांना शेतामध्ये उपलब्ध नाही. वीज व्यवस्था केवळ शहरी भागात 24 तास आहे. त्यामुळेच शासनाने आता शेतात 24 तास नाही. मात्र, बारा तास वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे.
या विषयाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,"शेतकऱ्यांना विजेबाबत अडचण भासू नये म्हणून सर्व फीडर सौर ऊर्जेवर आणणार आहे. याद्वारे ४००० मेगावॅट वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याचा प्रयत्न असल्याचे, उपमुख्यमंत्री यांनी घोषणा करताना सांगितले आहे.