ETV Bharat / state

Mahalakshmi Temple Mumbai : नाणं भिंतीवर चिटकवल्यास मनोकामना पूर्ण करणारं जागृत देवस्थान, मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर - Read Details In Marathi

मुंबई मधील एक सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असलेलं महालक्ष्मी मंदिर. या मंदिरात भाविक श्रध्देने येतात. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्तजन एक सिक्का भिंतीवर चिटकवतात. आणि आश्चर्याची बाब म्हणजे हा नाणं भिंतीवर चिपकला देखील जातो. महालक्ष्मी मंदिर हे जागृत स्थान आहे, इथे येणाऱ्या सर्व भक्तांची इच्छा पूर्ण होते.

Famous Mahalakshmi Temple Mumbai
मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर
author img

By

Published : Feb 13, 2023, 6:30 PM IST

प्रतिक्रिया देतांना भाविक

मुंबई : महालक्ष्मी मंदिर मुंबई मधील एक सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर अरब सागरा जवळच्या किनाऱ्यालगत महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथील भुलाबाई देसाई मार्गावरती स्थित आहे. हे मंदिर लाखो लोकांचं विश्वासाचं आणि प्रार्थनेचं स्थळ आहे. महालक्ष्मी मंदिर समुद्राच्या अगदी जवळच आहे. या मंदिरात तीन अतिशय सुंदर मूर्ती आहेत. गर्भगृहामध्ये महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन देवींच्या प्रतिमा एक साथ विराजमान आहेत. महालक्ष्मी देवीची प्रतिमा ही मधोमध आहे. तर महालक्ष्मी देवीच्या उजव्या बाजूला महाकाली व डाव्या बाजूला महासरस्वती मातेची प्रतिमा आहे.

मंदिराचे रहस्य : लक्ष्मी मंदिर हे मुंबईतील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी लाखो भाविक इथे गर्दी करतात. दिवसांमध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भक्त महालक्ष्मीची वास्तविक प्रतिमा नाही बघू शकत. असं म्हणतात ही, वास्तविक प्रतिमा पूर्ण दिवसभर एका आवरणाने झाकली जाते. प्रतिमा बघायची असेल तर रात्रीची वेळ योग्य आहे. रात्री जवळपास साडे नऊ वाजल्यानंतर ह्या प्रतिमे वरून आवरण थोड्यावेळासाठी काढलं जातं. इथे रात्री उशिरापर्यंत श्रद्धाळूंची मोठ्या प्रमाणावर संख्या बघायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात एक भिंत आहे. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भक्तजन एक नाणं भिंतीवर चिटकवतात. आणि आश्चर्याची बाब म्हणजे हे नाणं भिंतीवर चिपकला देखील जातो. महालक्ष्मी मंदिर हे जागृत स्थान आहे, इथे येणाऱ्या सर्व भक्तांची इच्छा पूर्ण होते. मुंबई शहर हे राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस मार्गांनी चांगल्या स्थितीत जोडलं गेलं आहे. बेस्टच्या बसेस तसेच खाजगी मुंबई दर्शनासाठी च्या बससेवा या मार्गावरून दररोज चालू असतात.

मंदिराचा इतिहास : मुंबई मधील वरळी आणि मलबार हिल ज्याला आपण आता कँडी ब्रिज असं म्हणतो, या ब्रिजला जोडणारी भिंत बनवण्याच्या वेळी एक अदभूत घटना घडली असं म्हटलं जातं. मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉर्नबी ने मुंबई आणि वरळी ही दोन बेटे समुद्रात भरणी करून बांधण्याचा विचार केला. व्यापारी असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीनचा हा प्रयोग मंजूर नव्हता. मुंबई बेटाचा दक्षिण टोक जे सध्या महालक्ष्मी मंदिर म्हणून ओळखल जातं आणि समोरचं वरळी गाव म्हणजेच मुंबई महानगरपालिकेचं लव्ह ग्रोव्ह उंदचन केंद्र किंवा अत्रीया मॉल आहे. तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरले होते. पावसाळ्याच्या दिवसात हे पाणी संपूर्ण भायखळा पर्यंत पोहोचायचं. त्यामुळे मुंबई बेटावरून वरळी कडे जायला होडी शिवाय दसरा पर्यायच नव्हता. ब्रिटिशांनी समुद्राचे पाणी जिथुन आत घुसायचे त्या भागाला द ग्रेट ब्रिच असं नाव दिलं होतं. म्हणूनच जॉन ने हि खाडी भरून काढण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई बेटावरून थेट वरळीला जाण्यासाठी एक गाडी मार्ग ब्रिज बनवायचं ठरवलं.

वरळी बांध : ह्या प्रकल्पाची सुरुवात त्याने इंग्लंड कार्यालयाच्या परवानगी शिवायच केली. तेव्हां या बांधकामाचं नाव वरळी बांध असं होतं. तेव्हा या कामाची सगळी सूत्रे रामजी शिवाजी यांच्या हाती होती. हे एक तरुण इंजिनियर होते. बांधकाम सुरू झालं आणि दगडांच्या राशीच्या राशी पाण्यात भरल्या गेल्या. पण थोडं बांधकाम चांगलं झालं की हा बांध समुद्राच्या रेट्याने घसरून पडत असे. असं बरेच महिने चालू राहील, परंतु रामजी आणि जॉन या दोघांनी हिम्मत नाही हरली. आणि त्यांनी हे काम चालूच ठेवलं तसं बघायला गेलं तर त्या वेळेच तंत्रज्ञान बघता हे काम थोडं अवघडच होतं. तेव्हा बांधकाम करणाऱ्यांना खूप काही संकट आली. ब्रिटिश इंजिनियरसचे पण खूप सारे प्रयत्न वाया गेले. तेव्हा प्रोजेक्टचे चीफ इंजिनियर म्हणजे रामजी शिवाजी यांच्या स्वप्नात महालक्ष्मी देवीने दर्शन दिले. आणि ती म्हणाली वरळीच्या जवळच्या समुद्रामध्ये माझी एक मूर्ती आहे. ती काढून तुम्ही तिथे माझं मंदिर बनवा आणि पुढचे सगळे संकट दूर होतील. तेव्हा त्यांनी लक्ष्मीच्या आदेशानुसार शोध काम करायला सुरुवात केली. आणि त्यांना त्याच ठिकाणी महालक्ष्मी देवीची मूर्ती देखील सापडली. आणि या घटनेनंतर चीफ इंजिनियरने त्याच जागी एक छोटेसे मंदिर बांधले. नंतर ब्रिज निर्माण संबंधित कार्य देखील त्वरित पार पडलं गेलं. आज त्याच ठिकाणाला आपण मुंबईचे महालक्ष्मी मंदिर असं म्हणतो. अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भुलाबाई देसाई मार्गावर समुद्रकिनाऱ्याजवळ स्थित आहे. मंदिरात चे निर्माते एक व्यापारी धाकजी दादाची होते. ज्यांनी १८३१ मध्ये या मंदिराची स्थापना केली.

मंदिर वास्तुकला : महालक्ष्मी मंदिर मुंबई मधील एक सर्वात मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर जवळचा किनाऱ्यालगत भुलाबाई देसाई स्थित आहे. हे मंदिर लाखो लोकांचं विश्वासाचं आणि प्रार्थनेचे स्थळ आहे. महालक्ष्मी मंदिर समुद्राच्या अगदी जवळच आहे. या मंदिरात तीन अतिशय सुंदर मूर्ती आहेत. गर्भगृहामध्ये महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन देवींच्या प्रतिमा एक साथ विराजमान आहेत. तिन्ही प्रतिमांना सोन्याची नथ, सोन्याच्या बांगड्या आणि मोत्याच्या हारांनी अतिशय सुंदर सजवलं गेलं आहे. मंदिराच्या मुख्य द्वारावर देखील सुंदर नक्षी कोरली गेली आहे. हे मंदिर हाजी अली दर्गाच्या इथे एकदम जवळच्या समुद्र तटावर स्थित आहे. हाजीअली मधून महालक्ष्मी मंदिर देखील दिसते. समुद्रकिनारी असल्यामुळे ह्या मंदिराची सुंदरता आणि आकर्षकता अजूनच वाढली आहे.
मंदिर परिसरात विविध देवी-देवतांचे आकर्षक प्रतिमा पण स्थापित केल्या गेल्या आहेत. मंदिराच्या परिसरात अन्य देवदेवतांचे देखील मंदिर आहे. या मंदिरामध्ये श्री हनुमान यांचं एक पातळी हनुमान नावाचं मंदिर आहे. जिथे मंदिराच्या आत मध्ये हनुमान जी यांची मूर्ती चांदीच्या आवरणामध्ये आहे. महालक्ष्मी मंदिराच्या जवळच एक धाकलेश्वर महादेव मंदिर देखील आहे. हे मंदिर २०० वर्ष जुनं आहे.

मंदिराचे वैशिष्ट्य : मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. मंदिरात देवीच्या तीन मुर्त्या आहेत आणि या तिन्ही मुर्त्या अतिशय सुंदर पद्धतीने सजवल्या केल्या आहेत. नेहमी मुर्त्या मुख्य गाभार्यात एक साथ स्थित आहेत. तीनही मूर्तीचे खरे स्वरूप सोन्याच्या आवरणाने झाकून ठेवले आहे. खूपच कमी लोक आहेत, ज्यांनी या मंदिरामधील विराजमान देवी महालक्ष्मी ची मूर्ती स्वयंभू आहे आणि ज्यांनी देवीच वास्तविक मूर्ती बघितली असेल. सकाळी सहा वाजता मंदिर उघडल्यावर देवीवर अभिषेक केला जातो. त्यानंतर पुन्हा मूर्तीवर आवरण चढवले जाते. मंदिर सकाळी सहा वाजता खुलतं आणि रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतं.

मंदिरातील उत्सव : लक्ष्मी मंदिर मुंबईतील भाविकांचं श्रद्धेचे स्थान आहे. नवरात्री हा सण इथे खूप मोठ्या धामधुमीत साजरा होतो. नवरात्रीमध्ये हे मंदिर खूप आकर्षित पणे सजवले जाते. भाविक इथे इतकी गर्दी करतात की मंदिरात उभं राहायला देखील जागा नसते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी या मंदिरात बघायला भेटते. मंदिराच्या कंपाऊंडमध्ये हार, फुल, ओढणी, प्रसाद, मिठाई, इत्यादी ची दुकाने आहेत. हे सामग्री भक्तजन खरेदी करून देवीला अर्पण करतात. फक्त मुंबईच नाही तर, भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येऊन देवीसमोर माथा टेकवतात.

हेही वाचा : Somvati Amavasya 2023 : वर्ष 2023 मध्ये कधी आहे सोमवती अमावस्या? काय आहे महत्व?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.