ETV Bharat / state

Sharad Pawars Resignation : शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोलसाठी कसरत सुरू - Jayant Patil on Meeting in Mumbai

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांसह वरिष्ठ नेतेदेखील गोंधळात पडले आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी भावूक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजूनही लावून धरली आहे. अशातच यशवंतराव चव्हाण सभागृहातील राष्ट्रवादीच्या बैठकीचे आपल्याला निमंत्रण नव्हते, याचा खुलासा स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात केला.

शरद पवार राजीनामा पडसाद
Sharad Pawar Resigns impact
author img

By

Published : May 3, 2023, 5:14 PM IST

Updated : May 3, 2023, 5:27 PM IST

बैठकीला बोलाविले नव्हते, जयंत पाटील यांची माहिती

मुंबई: बैठकीला निमंत्रण नसल्याची माहिती जयंत पाटील यांच्या खुलाशानंतर राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली. यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कोणतीही बैठक बोलाविली नसल्याची सारवासारव केली. प्रत्यक्षात मात्र सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी सिल्व्हर ओकवर भेट दिली होती. तर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात हजेरी लावली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नव्हते. ही माहिती समजताच शरद पवारांनी जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

जयंत पाटील म्हणाले, की माझे सुप्रिया यांच्यासोबत बोलणं झाले. त्यांनी सांगितले, की अशी कोणतीही बैठक मुंबईत आयोजित केली नव्हती. त्याचबरोबर पवार साहेबांशी बोलणे झाले आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुण्यातली पुढे ढकलण्यात आल्याची मोठी चर्चा आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले उन्हा मळे पुण्याची वज्रमुठ सभा पुढे ढकलली आहे. अनौपचारिक चर्चेमध्ये संध्याकाळी ही सभा पुढे ढकलण्याची निर्णय झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, की राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि इतर नेते आज मुंबईमध्ये नाहीत. मात्र, पुढील बैठकीला सगळे नेते हजर राहणार आहेत. जयंत पाटील बैठकीला नसल्याचे चॅनलवर दाखवले जात आहे. जयंत पाटलांना बोलावले नाही, ही चुकीची माहिती आहे.

आम्हाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणारच- राष्ट्रीय पक्ष नसलेल्या पदाचा राजीनामा देण्यात काय अर्थ आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीवर केली होती. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, की राष्ट्रवादीबद्दल बोलताना मुनगंटीवार यांचा वारंवार तोल का जातो, हेच मला कळत नाही. प्रत्येक गोष्टी मध्ये टेक्निकल मुद्दे उपस्थित करून राजकारण होत नसते. राजकारण हे लोकांच्या समाजाचा मनावर असते. सुधीर मुनगंटीवार आमच्या पक्षाचे जबाबदार मंत्री आहेत. शरद पवार आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राज्यात आणि देशातल्या वेग वेगळ्या भागातल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा प्रयत्न केला तर आम्हाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणारच आहे. कर्नाटकमध्ये आम्ही निवडणुका लढवित आहोत. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष म्हणून आणि त्याचे मान्यता मिळणे हे औपचारिकपणा आहे, असेच यावेळी जयंत पाटील म्हणाले आहेत.

शरद पवारांच्या राजीनाम्याचे कारण अजून कळाले नाही? शरद पवार साहेब अध्यक्ष पदी राहावे ही देशातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. या बाबत समिती नेमण्यात आली आहे. शरद पवारांनी नेमका राजीनामा का दिला, याबाबत चर्चा करायला काल वेळ मिळाला नाही. तशी चर्चाही झाली नाही. त्यामुळे कारण काय ते मला अजून कळाले नाही. पण त्यांनी स्वतःहून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. सुप्रिया सुळेंचे नेतृत्व स्वीकारले जाईल का ? याबाबत जयंत पाटील म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वप्रथम शरद पवार राजीनामा देणार नाहीत. असे आमचे सगळ्यांचे प्रयत्न असणार आहेत. त्यानंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची भूमिकेचे उत्तर आज देणे योग्य नाही.

माध्यमांशी बोललल्यानंतर मुंबईला रवाना- शरद पवारांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर मंगळवारी जयंत पाटील यांनी सभागृहातच रडू कोसळले होते. साहेबांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज असल्याचे सांगत त्यांनी राजीनामा मागे घेण्याची पवारांना विनंती केली होती. शरद पवारांचा आज फोन आल्यानंतर काही वेळाने जयंत पाटील पुण्यातून बैठकीसाठी रवाना झाले. राष्ट्रवादीची सिल्व्हर ओकवर आज संध्याकाळी ५ वाजता बैठक आहे. या बैठकीला जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड करायची, याबाबत महत्त्वाची बैठक असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, तरीही जयंत पाटील मुंबईतील बैठकीला नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले- प्रफुल्ल पटेल यांनीदेखील कोणतीही बैठक झाली नसून निर्णयहीदेखील झाला नसल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. छगन भुजबळ यांनी राज्यात अजित पवार व दिल्लीत सुप्रिया सुळे अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्या नावावर शिक्कामोर्तब होणार ही चुकीची माहिती आहे. शरद पवार यांच्या मनात काय आहे, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केले नाही. बैठक जेव्हा असेल तेव्हा मीच सांगणार आहे, कारण मी निमंत्रक आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-Bawankule On NCP : राष्ट्रवादीतील नेत्याच्या भाजप प्रवेशाबाबत चंद्रशेख बावनकुळे यांचे मोठे वक्तव्य

Last Updated : May 3, 2023, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.