मुंबई - बनावट लसीकरण प्रकरणी कांदिवलीच्या शिवम रुग्णालयाचे मालक असलेल्या जोडप्याला पोलीसांनी अटक केल्याची माहिती, मुंबईचे सह पोलीस आयुक्तांनी दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट लसीकरण प्रकरणी हे दोघेच मुख्य आरोपी आहेत. याबाबत लवकरच मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत.
मुंबई महापालिकेद्वारे दिली लस
पहिल्या वेळेस काही लसी रुग्णालयाने राखून ठेवल्या होत्या. याच लसींचे डोस शिवम रुग्णालयाने आरोपींना दिले होते. याचा उपयोग नंतर हिरानंदानी सोसायटीमध्ये करण्यात आला. आातापर्यंत एकूण १० लोकांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
कांदिवली परिसरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळख असणाऱ्या हिरानंदानी सोसायटीमधील 390 नागरिकांना देण्यात आलेल्या बनावट व्हॅक्सिनेशन संदर्भात मुंबई पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला होता. यात आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली असताना यातील एक महत्त्वाचा आरोपी हा फरार असल्याचे समोर आले आहे. फरार झालेला आरोपी हा डॉक्टर असून त्याच्या नावावर, कांदिवली, वर्सोवा, खार पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात होते.
हेही वाचा - एसीबी करणार सचिन वाझे याची खुली चौकशी, वाझेने लाच घेतल्याच्या दोन तक्रारी