मुंबई Fake Dandiya Passes Sold : नवरात्रीच्या काळात गरबा आणि दांडियाला विशेष महत्त्व आलं आहे. स्पर्धेच्या आणि फॅशनच्या या युगात आजही गरबा तितकाच उत्साहात खेळला जातो. नवरात्रीच्या या काळात अनेक ठिकाणी गरबा-दांडियांचं आयोजनही केलं जातं. दरम्यान, असं असतांनाच आता नवरात्रीच्या काळात फसवणूक करण्याचा नवीन प्रकार आरोपींनी शोधून काढलाय. दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचा गरबा सीझन पास मिळवून देण्याच्या नावाखाली तब्बल १६० जणांची ५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलीये. दरम्यान, या प्रकरणी एमएचबी कॉलनी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
एमएचबी पोलिसांकडून चौघांना अटक : फाल्गुनी पाठक यांच्या दांडियांचे स्वस्तात पास देण्याच्या नावाखाली एका तरुण व्यापार्याची फसवणूक करणार्या टोळीचा एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केलाय. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ९१ हजारांची रोकड, साडेनऊ लाखांची इनोव्हा कार, एक आयफोन असा १० लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलायं. अश्विन रमाकांत सुर्वे (२४), श्रीपाल मुकेश बगाडिया (३८), सुशील राजाराम तिर्लोटकर (३०), संतोष भागवत गुंबर (३५) अशी आरोपींची नावे आहेत. ते दहिसर आणि बोरिवली येथील रहिवासी आहेत.
अगोदरही अशीच एक घटना कांदीवलीत घडली : काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना कांदीवलीत घडल्याचं समोर आलं होतं. निहार श्रेयस मोदी हा कांदीवलीतील ठाकूर व्हिलेजमध्ये राहत असून त्याचा त्याच्या वडिलांसोबत पेंटींगचा व्यवसाय आहे. नवरात्रोत्सवानिमित्त फाल्गुनी पाठकच्या गरबा कार्यक्रमाचे १५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत बोरीवलीतील चिकूवाडी परिसरात आयोजन करण्यात आले होते. निहारला त्याच्या मित्रानं विशाल शहाची माहिती दिली होती. विशाल हा फाल्गुनी पाठकचा शोचा अधिकृत आयोजक आहे. त्याच्या ओळखीतून त्यांना ३३ हजारांमध्ये पासेस मिळतील असं सांगण्यात आलं. मात्र, संबंधित व्यक्तीनं फाल्गुनी पाठक गरब्याचे स्वस्तात पास देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार लक्षात येताच एमएचबी कॉलनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी विशाल शहासह त्याच्या मित्राविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरू केला.
हेही वाचा -