मुंबई - परदेशातील नागरिकांना व्हायग्रासह विविध औषधांची विक्री करीत असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक 9 कडून करण्यात आली.
मुंबईतील जोगेश्वरी पश्चिम येथे अलटिट्यूड नावाचे बोगस कॉल सेंटर चालु असल्याचे पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर या संदर्भात कॉल सेंटरवर छापा मारण्यात आला होता. या कॉल सेंटरच्या माध्यमातून सेक्ससंबंधित औषधांची विक्रीच्या नावाखाली परदेशी नागरिकांकडून पैशांची मागणी करून त्यांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर पोलिसांनी सदरच्या कॉल सेंटरवर छापा मारून तब्बल 10 हार्ड डिस्क, 1 लॅपटॉप, 1 राऊटर, 10 मोबाइल, मीडिया कन्वर्टर सारखे साहित्य आणि 10 आरोपींना अटक केली आहे. यातील 5 आरोपी फरार म्हणून घोषित करण्यात आले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता.
कामोत्तेजक औषधांच्या विक्रीखाली फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा
परदेशातील नागरिकांना व्हायग्रासह विविध औषधांची विक्री करीत असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे.