ETV Bharat / state

MCA Election: क्रिकेट मधिल कामगिरीवरुन फडणवीसांनी केली शरद पवारांची स्तुती

क्रिकेटच्या मंचावर आज राजकीय नेत्यांमध्ये सौहार्दा सोबत खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai cricket association) निवडणुकीपूर्वी झालेल्या स्हेहभोजनात एकमेकांवर स्तुतीसुमनांचा वर्षांव केल्याचे पहायला मिळाले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Oct 20, 2022, 1:00 PM IST

मुंबई: क्रिकेटच्या मंचावर आज राजकीय नेत्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई क्रिकेट असोसिएशनची (Mumbai cricket association) 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी झालेल्या स्हेहभोजनात विविध पक्षांचे नेते एकत्र जमले होते.

शरद पवारांच्या भाषणाने कार्यक्रमाने सुरुवात: जेष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पवार म्हणाले की, वानखेडे स्टेडियमची लीज मुदत संपली आहे, ती वाढवून मिळावी. तसेच मैदानाच्या सुरक्षेसाठी जनतेकडून वसुली करू नये.

पवार पुढे म्हणाले की, परवा बीकेसी मध्ये जी सभा घेतली त्याच्या सुरक्षेसाठी जनतेकडून वसुली केली गेली. खेळाचे मैदान व त्याची कायदा सुव्यवस्था व सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे याचे शासनाने भान असू द्यावे. वानखेडे स्टेडियमची लीजची मुदत संपली आहे. ती वाढून मिळावी. तसेच इतर खेळाच्या विकासाच्या संदर्भात देखील शासनाने काही सकारात्मक विचार करावा. महाराष्ट्रात तीन क्रिकेट असोसिएशन आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशन. मुंबई क्रिकेट असोसिएशन हे ताकदवान आहे, मात्र बाकी दोघांचा जास्त प्रभाव नाही. याचा जरा शासनाने अधिक विचार करावा. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सुरक्षेच्या संदर्भातले 50-52 कोटी रुपयांची काहीतरी समस्या आहे, तिची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली.

फडणवीसांनी यांनी केले शरद पवारांचे कौतुक: आपल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शरद पवार यांचे कौतूक केले. फडणवीस म्हणाले, राजकारणात शरद पवारांसारखा दिग्गज नेता नाही. क्रिकेट खेळाला त्यांनी एक नवी दिशा दिली आहे. क्रिकेटच्या क्षेत्रात त्यांचं मोठ योगदान आहे. पवार साहेबांनी केलेल्या सूचनेवर आम्ही नक्कीच विचार करू. या शासनाकडून विदर्भाला नक्कीच सवलत मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र असोसिएशनला देखील आम्ही सवलत देऊ. पवार साहेबांना आम्ही आश्वस्त करत आहोत की, खेळ आणि खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या तीनही क्रिकेट असोसिएशन साठी मी स्वतः आणि महाराष्ट्र शासन जमेल तितकं सहकार्य करू.

तसेच एमसीएचे खजिनदार आणि भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील पवारांचे कौतुक केले. ते म्हणाले की, मुंबई क्रिकेट असोसिएशन आज जे काही या नावारूपाला आलेल आहे, ते शरद पवार यांच्यामुळेच. त्यांच्या अथक मेहनत, परिश्रम, दूरदृष्टी आणि जिद्द यामुळेच या असोसिएशनची प्रतिष्ठा देशात निर्माण झालेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.