मुंबई: मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. बेस्टकडून मागील वर्षी गणेशोत्सव, नवरात्री, महापरिनिर्माण दिन, डॉ. आंबेडकर जयंती आदी प्रसंगी विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्याचसोबत प्रवाशांना प्रवास करण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या होत्या. आताही रविवारी २३ एप्रिल रोजी बासी ईदच्या दिवशी संपूर्ण शहरात विशेषतः मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजी नगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी माहीम, धारावी, अँटॉप हिल आदी भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
जादा बसचा फायदा घ्या: मुंबईमधील बासी ईदच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन याही वर्षी मुस्लिम धर्मियांना मुंबईभर चांगला आणि सुखद प्रवास करता यावा म्हणून २७ बेस्ट डेपोमधून १६५ जादा बस सोडण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. बेस्टकडून चालवण्यात येणाऱ्या जादा बसचा फायदा प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले आहे.
प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा: बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी एसी बसेस चालवण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांना कमीत कमी खर्चात चांगला आणि सुखद प्रवास करता यावा म्हणून बेस्टने नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.
निवडणुकीत बेस्टची कमाई 48 लाखांवर: मुंबईत राजकीय पक्षांनी 2019 साली प्रचारासाठी बेस्टच्या बसचा वापर केला होता. शिवसेनेने १०० आणि काँग्रेसने २० बसवर जाहिराती लावल्या होत्या. त्यामधून बेस्टची ४८ लाख रुपयांची कमाई झाली आहे. बेस्ट आर्थिक संकटात आहे. तोट्यात असलेल्या बेस्टला यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
बेस्टला दिलासा: मुंबई निवडणुकीच्या प्रचारासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. मुंबईत राजकीय पक्षांनी प्रचारासाठी बेस्टच्या बसचाही वापर केला आहे. त्यामधून बेस्टची ४८ लाख रुपयांची कमाई झाली आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
बेस्टच्या खजिन्यात सुमारे ४८ लाखांची भर: निवडणुकीत बॅनर, पोस्टर, पत्रक, प्रचार फेऱ्या, सभा, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला गेला. बेस्टच्या बस मुंबईतसह बाहेरही अनेक ठिकाणी दिवसभर फिरत असल्याने या निवडणुकीत बेस्टच्या बसचाही प्रचारासाठी वापर करण्यात आला. शिवसेनेने १०० आणि काँग्रेसने २० बसवर जाहिराती लावल्या होत्या. बेस्ट बसवर जाहिरातींसाठी नेमलेल्या कंत्राटी एजन्सीच्या माध्यमातून या जाहिराती लावण्यात आल्या होत्या. बेस्टच्या बसवरील जाहिरातींसाठी राजकीय पक्षांनी सुमारे ४८ लाख रुपये मोजल्याचे समजते. बेस्टच्या एका बसवरील जाहिरातीसाठी सुमारे ४० हजार रुपये इतका दर आहे. या जाहिरातींमुळे बेस्टच्या खजिन्यात सुमारे ४८ लाखांची भर पडली आहे.