मुंबई - एसएससी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरणा मुदतवाढ देण्यात आली आहे. 11 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. शाळांनी 1 डिसेंबर 2012 पर्यंत शुल्कासह प्रक्रिया पूर्ण करायची आहे. SSC Exam बारावीसाठी नियमित शुल्काकरिता विद्यार्थी 6 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर अर्ज भरू शकतात. तर उशिरात उशिरा 16 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरणा करायचा आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे फॉर्म भरण्याची मुदत ऐन दीपावली या सणाच्यावेळी केलेली होते. यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक याच्यामध्ये नाराजीचा सूर उठला होता. परिणामी राज्यातील हजारो शिक्षक मुख्याध्यापक यांनी ही मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी केली होती. प्रसारमाध्यमांनी दखल घेतल्यामुळे महाराष्ट्र राज्य दहावी आणि बारावी परीक्षा मंडळाने अखेर दखल घेतली आहे.
ऐन दिवाळीत होणार होती ऑनलाईन अर्ज भरणा प्रक्रिया दहावीची आणि बारावीची परीक्षा येणाऱ्या मार्चमध्ये होणार आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अर्थात जे विद्यार्थी नियमित परीक्षेसाठी बसणार आहेत. त्यांनी ऑनलाईन अर्ज भरणा करण्यासाठीची मुदत ही दिवाळीमध्ये संपत होती. मात्र शाळाच 9 नोव्हेंबर रोजी सुरू होत असल्यामुळे दहावीपर्यंतच्या शाळा आणि दहावीनंतर कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षण संस्था यादेखील दिवाळीनंतरच सुरू होत असल्याने राज्यभरातून दहावी आणि बारावी परीक्षा मंडळाच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आणि मागणी केली आहे की, दिवाळीनंतर ऑनलाइन परीक्षेसाठीचा अर्ज भरणा मुदतवाढ मिळावी. अखेर प्रसारमाध्यमांनी या शिक्षक पालकांच्या भूमिकेला उचलून धरलं आणि शासनाने विचार केला. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नियमित बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळालेली आहे.
शिक्षक पालक मुख्याध्यापक यांनी मंडळाला दिले धन्यवाद यासंदर्भात बृहन्मुंबई क्षेत्रातील मुख्याध्यापक संघटनेचे नेते पांडुरंग केंगार यांच्यासोबत ईटीवी भारत वतीने संवाद साधला असता त्यांनी खुलासा केला की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे फॉर्म भरण्याची मुदत ऐन दीपावली या सणाच्यावेळी केलेली होते. यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, लिपिक याच्यामध्ये नाराजीचा सूर उठला होता. पूर्वी दिलेल्या तारखेमध्ये बदल करून आता नियमित शुल्कसाहित दिनांक 11.11.2022 ते 25.11.2022 असे केल्यामुळे उपरोक्त सर्वानी पुणे बोर्ड व विभागिय बोर्ड याना धन्यवाद दिले.
मुदतवाढ या तारखेपर्यंत यासंदर्भात महाराष्ट्र राज्य दहावी बोर्ड सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी शाळेच्या मार्फत आपले ऑनलाइन आवेदन पत्र दहावीच्या परीक्षेसाठी भरावयाचे आहे. त्याची मुदत आता 11 नोव्हेंबरपासून 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत आता अर्ज भरणा करावयाचा आहे. तसेच बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी 6 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत नियमित परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरणा करायचा आहे. तर उशिरा 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात. मात्र उशिरा अर्थात विलंबाने ऑनलाइन अर्ज करताना त्याचे शुल्क देखील द्यावे लागेल.
दहावी आणि बारावी साठीच्या शिक्षण संस्था करिता विशेष सूचना दहावी परीक्षेसाठी च्या शाळांनी 1 डिसेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे शुल्क भरल्याच्या पावतीसह यादा परीक्षा मंडळाकडे पाठवायचे आहेत. तर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्थात बारावीला जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्या शिक्षण संस्थांनी 2 डिसेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांची सगळी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून सर्व माहिती परीक्षा मंडळाकडे सुपूर्द करायची आहे. तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कसह अर्ज भरणा अंतिम झाल्याच्या पावत्यासह सर्व माहिती 7 डिसेंबर 2022 पर्यंत परीक्षा मंडळाकडे पाठवायचे आहे.