ETV Bharat / state

पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ, महाआयटी कंपनीवरच मेहेरनजर केल्याचा स्पर्धा समितीचा आरोप - महाआयटी कंपनी

महाराष्ट्र शासनाने महा रोजगार मेळावा आयोजित ( Maha Rozgar Mela ) केला आणि वर्षाला 75 हजार रोजगार उपलब्ध करू अशी घोषणा केली. राज्यामध्ये एकूण तीन लाख सरकारी नोकर भरतीची ( government portal ) गरज आहे. सर्वांच्या दबावामुळे शासनाने पोलीस भरती संदर्भात निर्णय जाहीर (government portal related to police recruitment ) केला. मात्र पोलीस भरती संदर्भातील शासकीय पोर्टल धड चालत नव्हते.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 30, 2022, 6:45 AM IST

मुंबई : पोलीस भरतीसाठी शासनाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस भरतीसाठीचे पोर्टल धड चालत नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळलेली होती. यावर उपाय म्हणून गृहमंत्रालयाने पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत ( applications for MH police recruitment ) वाढवून दिलेली आहे. आता उमेदवार 15 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. मात्र शासनाचे महाआयटी या घोटाळेबाज कंपनीवर ( Students displeasure on Maha IT ) प्रेम का असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे.

महाराष्ट्र शासनाने महा रोजगार मेळावा आयोजित ( Maha Rozgar Mela ) केला आणि वर्षाला 75 हजार रोजगार उपलब्ध करू अशी घोषणा केली. राज्यामध्ये एकूण तीन लाख सरकारी नोकर भरतीची ( government portal ) गरज आहे. सर्वांच्या दबावामुळे शासनाने पोलीस भरती संदर्भात निर्णय जाहीर ( government portal related to police recruitment ) केला. मात्र पोलीस भरती संदर्भातील शासकीय पोर्टल धड चालत नव्हते. उमेदवारांच्या मागणीनंतर महाराष्ट्र शासनाने पोलीस भरतीच्या अर्ज भरण्याची मुदत ( deadline for filling police recruitment applications ) वाढवून दिली आहे.

महाआयटी कंपनीलाच काम देण्याचे कारण काय स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे समन्वयक राहुल गोठेकर यांनी सांगितले की,'विद्यार्थी शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व कागदपत्रे ओळखपत्र शालेय महाविद्यालयीन कागदपत्रासह डेटा भरण्यासाठी शासनाने अधिकृत केलेल्या पोर्टलवर माहिती भरत आहेत. मात्र शासकीय वेबसाईट धड चालत नव्हती. शासनाने मुदतवाढ दिली चांगले केले. मात्र महाआयटी असताना अनेकदा घोटाळे केले. पुन्हा त्याच कंपनीवर फडणवीस यांचे एवढे प्रेम का?"

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते अमोल मातेले यांनी ई टीव्हीसोबत बातचीत करताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस भरती रखडली होती. शासनाने उशिरा का होईना पोलीस भरती सुरू केली. मात्र यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरणे क्रम प्राप्त आहे. परंतु पोलीस भरतीसाठीचे पोर्टल जे आहे ते व्यवस्थित नव्हते. मुदतवाढ आता सरकारने दिली आहे. मात्र राज्यामध्ये मोठमोठ्या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील चांगल्या कंपन्या असताना महाराष्ट्र शासन महाआयटी कंपनीला जबाबदारी देत आहे. शासनाने यावर ताबडतोब दाखल घेणे जरुरी आहे.

१८,३३१ पदांसाठी ११ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त : महाराष्ट्र पोलिसांकडे राज्य राखीव पोलिस दलातील हवालदार, चालक तसेच कर्मचाऱ्यांच्या १८,३३१ पदांसाठी ११ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने मंगळवारी दिली. एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुकांनी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. फॉर्म भरण्यासाठी सरकारी पोर्टलवर, वेबसाइटची गती कमी होण्यासारख्या समस्या होत्या, परंतु त्या दुरुस्त करण्यात आल्या, असे ते म्हणाले. नोकरीसाठी इच्छुकांपैकी अनेकांनी फॉर्म भरण्यासाठी रात्री उशिरापर्यंत वेबसाइटवर नोंदणी करण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. 9 नोव्हेंबरपासून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते आणि बुधवारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवार दुपारपर्यंत आम्हाला 10.74 लाख अर्ज आले होते, परंतु आता आम्ही म्हणू शकतो की आम्हाला 11 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.