ETV Bharat / state

मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे भाजप आमदारांमधील असंतोषाची शांती - अशोक चव्हाण - डॉ. शंकरराव चव्हाण

काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या दाव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस पक्षातील आमदार विचारधारेशी एकनिष्ठ असून भाजपने कितीह प्रयत्न केले तरी एकही आमदार भाजपमध्ये जाणार नाही. मात्र भाजपला सत्तेची धुंदी चढल्यामुळे ते अशा प्रकारे विरोधी पक्ष फोडण्याची विधाने करीत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण
author img

By

Published : Jun 9, 2019, 5:19 PM IST

मुंबई - राज्य मंत्रिमंडळात फेरबदल झालाच तर तो सरकारच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी नाही तर केवळ भाजपमधील आमदारांमध्ये निर्माण झालेला असंतोष शमविण्यासाठी असेल, असा खोचक टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. टिळक भवन येथे आयोजित पदाधिका-यांच्या जिल्हानिहाय बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे भाजपच्या आमदारांमधील असंतोषाची शांती - अशोक चव्हाण

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसातच लागू होणार आहे. त्यामुळे नवीन मंत्री नेमले तरी ते फारसा प्रभाव पाडू शकणार नाहीत. सरकारच्या साडेचार वर्षाच्या कारभारावर केवळ जनताच नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे आमदार देखील नाराज आहेत. त्यामुळे आम्ही काही तरी नवीन करतो आहोत आणि सरकारचा चेहरा मोहरा बदलतो आहोत, असे चित्र उभे केले जात आहे. पक्षांतर्गत असंतोष शमविण्यासाठी विस्ताराचे चॉकलेट दिले जात असल्याचेही चव्हाण म्हणाले.

काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या दाव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस पक्षातील आमदार विचारधारेशी एकनिष्ठ असून भाजपने कितीह प्रयत्न केले तरी एकही आमदार भाजपमध्ये जाणार नाही. मात्र भाजपला सत्तेची धुंदी चढल्यामुळे ते अशा प्रकारे विरोधी पक्ष फोडण्याची विधाने करीत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान, शनिवारी दिवसभर झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी विदर्भातील पदाधिका-यांशी चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीचे निकाल, संबंधित जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व समस्या तसेच आगामी निवडणुकीच्या रणनितीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यात आला.

यावेळी काँग्रेसकडून डॉ. शंकरराव चव्हाण आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी राज्यभरात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ ऑगस्टनंतर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्धी वर्षांला सुरुवात होत असून त्यासाठी काँग्रेसकडून राज्यभरात कार्यक्रम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Intro:मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे केवळ असंतोष आमदारांना शमविणे- अशोक चव्हाणBody:मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे केवळ असंतोष आमदारांना शमविणे- अशोक चव्हाण
(यासाठी मोजोवरून अशोक चव्हाण बाईट नावाने बाईट पाठवलेला आहे, तो घ्यावा)
मुंबई,ता. ८ :
राज्य मंत्रीमंडळात फेरबदल झालाच तर तो सरकारच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी नव्हे तर केवळ भाजप आमदारांमध्ये असंतोष शमविण्यासाठी असेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
टिळक भवन येथे आयोजित पदाधिका-यांच्या जिल्हानिहाय बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वक्तव्य केले. मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे नविन मंत्री नेमले तरी ते फारसा प्रकाश पाडू शकणार नाहीत. सरकारच्या साडेचार वर्षाच्या कारभारावर केवळ जनताच नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे आमदार देखील नाराज आहेत. त्यामुळे आम्ही काही तरी नविन करतो आहोत आणि सरकारचा चेहरा मोहरा बदलतो आहोत असे चित्र उभे करण्यासाठी व पक्षांतर्गत असंतोष शमविण्यासाठी विस्ताराचे चॉकलेट दिले जात आहे असे चव्हाण म्हणाले.
काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या दाव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस पक्षातील आमदार विचारधारेशी एकनिष्ठ असून भाजपने कितीह प्रयत्न केले तरी आणखी कोणीही आमदार भाजपमध्ये जाणार नाही. मात्र भाजपला सत्तेची धुंदी चढल्यामुळे ते अशा प्रकारे विरोधी पक्ष फोडण्याची विधाने करीत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. दरम्यान शनिवारी दिवसभर झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी विदर्भातील पदाधिका-यांशी चर्चा केली. यावेळी लोकसभा निवडणुकीचे निकाल, संबंधित जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व समस्या तसेच आगामी निवडणुकीच्या रणनितीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यात आला.
यावेळी काँग्रेसकडून डॉ. शंकरराव चव्हाण आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांवी यांची जन्मशताब्दी राज्यभरात साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ ऑगस्टनंतर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्धी वर्षांला सुरूवात होत असून त्यासाठी काँग्रेसकडून राज्यभरात कार्यक्रम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Conclusion:मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे केवळ असंतोष आमदारांना शमविणे- अशोक चव्हाण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.