ETV Bharat / state

Kishori Pednekar : वरळी एसआरए घोटाळा प्रकरण! किशोर पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वरळी एसआरए घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोर पेडणेकर आणि मुलगा साईप्रसाद पेडणेकर यासह या प्रकरणातील इतर आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए संबंधित घोटाळ्यात आरोप केले होते. त्यानंतर दादर पोलिसांकडून किशोरी पेडणेकर यांची चौकशी करण्यात आली होती.

Kishore Pednekar
माजी महापौर किशोर पेडणेकर
author img

By

Published : Jan 28, 2023, 10:31 AM IST

मुंबई : किशोरी पेडणेकर यांना चौकशी दरम्यान पोलिसांकडून अटक करण्यात आल्यास त्यांना एक लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहे. याप्रकरणातील अन्य तीन आरोपींनाही कोर्टाकडून अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. सर्व आरोपींना देशाबाहेर जाण्यास मनाई मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच कोर्टाच्या परवानगीने परदेशात जाण्याची मुभा देण्यात येणार असे न्यायालयाने म्हटले आहे.

किशोरी पेडणेकरांवर आरोप : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए संबंधित घोटाळ्यात आरोप केले होते. त्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. ज्या ठिकाणी एसआरए घोटाळ्याप्रकणाचा आरोप होता. वरळी गोमाता नगर येथील एसआरए इमारतींमध्ये किशोरी पेडणेकर यांनी भेट दिली. तसेच आरोपांआडून आपल्यावर विरोधकांकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचा आरोप केला होता. मुंबईच्या माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांचे कोविड काळात केलेल्या कामाने त्यांचेही कौतुकही झाले. मात्र कोविड काळातील कंत्राट घोटाळ्याचे आणि वरळी गोमाता नगरमधील एसआरए घोटाळ्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी किशोरी पेडणेकरांवर केले. यापैकी सध्या गोमाता नगरमधील एसआरए घोटाळ्यात माजी महापौरांच्या नावाची चर्चा आहे. दादर पोलिसांनी एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने ही फसवणूक झाली. यामध्ये चार जणांना अटकही करण्यात आले. यामध्ये पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

एसआरए घोटाळा आणि किशोरी पेडणेकरांचा संबंध काय? : एसआरए घोटाळ्यातील आरोपीशी झालेल्या व्हाट्सपवरील संभाषणामुळे किशोरी पेडणेकर अडचणीत आल्या आहेत. दादर पोलिसांनी जून महिन्यात दाखल झालेल्या एसआरए प्रकल्पाशी संबंधित एका गुन्ह्यात पेडणेकर यांची चौकशी सुरू केली आहे. एसआरए मधील घर स्वस्तात मिळवून देतो , असे सांगून लोकांकडून पैसे उकळनाऱ्या तीन आरोपींना दादर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये एक महापालिकेचा कर्मचारी आहे. संजय लोखंडे असे या आरोपीचे नाव असून तो वसाहत विभागामध्ये नोकरीस आहे. संजय लोखंडे, संजय कांबळे व आणखी एक हे तीनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात आणखी तीन आरोपी आहेत.

व्हाटसपचॅट पोलिसांच्या हाती : एसआरए मधली घर स्वस्तात मिळवून देतो असे सांगून आरोपींनी 1 कोटी 35 लाख रुपये लोकांकडून उकळल्याच तपासात समोर आले. एकूण 9 लोकांकडून कडून हे पैसे घेण्यात आले होते. यामधला संजय लोखंडे आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे काही व्हाटसपचॅट पोलिसांच्या हाती लागलेत त्यावरून त्यांना चौकशीला बोलावण्यात आले होते. स्वस्तात फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली केलेली फसवणूक या आरोपाव्यतिरीक्त याच वरळी गोमाता नगर मधील काही गाळ्यांचा ताबा किशोरी पेडणेकरांकडे आहे असा दुसरा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

हेही वाचा : Aarey Metro Carshed आरे कारशेडमधील वृक्षतोडी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा जनहित याचिकापुढील आठवड्यात सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.