UNION BUDGET २०१९: सोन्यासह इंधन महागणार; ५ लाखपर्यंत उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीयांना करमाफ
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत आले आहे. मोदी सरकार २.० चा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. त्यानुसार सोन्यासह इंधन महागणार आहे, तर ५ लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीयांना कर माफ केले जाणार आहे. वाचा सविस्तर...
सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत नेणारा अर्थसंकल्प - विजय वडेट्टीवार
मुंबई - मोदी सरकार २.० चा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी निराशा पाडणारा अर्थसंकल्प आहे. कर वाढवून सामन्यांची लूट, महागाईने गरिबांचे कंबरडे मोडले आहे. तसेच शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम सरकार करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. वाचा सविस्तर...
अर्थसंकल्पावर नाशिककर नाराज; कामगारांसह शेतकरी वर्गाच्या आशा फोल ठरल्याचे व्यक्त केले मत
नाशिक - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडला आहे. पहिल्यांदाच महिला अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे. विविध क्षेत्रातून या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया येत आहेत. परंतु, नाशिककरांच्या या अर्थसंकल्पाबाबतच्या आशा फोल ठरल्या आहेत. वाचा सविस्तर...
'या' आहेत अर्थसंकल्पातील १५ महत्त्वाच्या घोषणा
नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केला. यामध्ये कॉर्पोरेट करात सवलत, स्टार्टअपसाठी टीव्ही, महिला बचतगटांना १ लाखापर्यंत कर्जाचे वाटप अशा विविध घोषणांचा समावेश आहे. वाचा सविस्तर...
माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्याकडून कोंबडी विक्रेत्यांना मारहाण
मुंबई - माजी महापौर व माहीमचे नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्याकडून कोंबडी विक्रेत्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. माहीम येथील मच्छिमार नगर व पोलीस वसाहतीमधील नागरिकांना या कोंबड्यांच्या दुर्गंधी आणि घाणीचा त्रास होत होता. रस्त्याच्या बाजूला उभ्या राहणाऱ्या कोंबड्यांच्या गाड्यांबाबत गेले अडीच वर्षे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे कायदा हातात घेतला असे नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर...