ETV Bharat / state

आज...आत्ता...सोमवारी सायंकाळी ७ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - bulletin of ETV Bharat

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसच्या सर्व २२तर जेडीएसच्या सर्व आमदारांनी राजीनामे दिले आहेत. राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अबाधित राखण्याचे आवाहन निवडणूक आयोगाला केले आहे, मुंबईत पावसामुळे मंत्रालयातील सिलिंगचा भाग कोसळला आहे. तसेच येत्या ४८ तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रवादीने दगाबाजी केल्यामुळे चव्हाण पराभूत झाले, असा आरोप भोकरच्या काँग्रेस आमदार अमिता चव्हाण यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jul 8, 2019, 7:21 PM IST

कर्नाटक संकट LIVE: काँग्रेसच्या २२ तर जेडीएसच्या सर्व मंत्र्यांनी दिला राजीनामा

बंगळुरु - कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसच्या सर्व २२तर जेडीएसच्या सर्व आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे कर्नाटकातील आघाडी सरकारला कॅबिनेट मंत्र्यांचे पुनर्खातेवाटप करणे शक्य होणार आहे. तसेच, याआधी राजीनामा देणाऱ्या बंडखोर नेत्यांनाही पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेता येणार आहे. सिद्धरामय्या आणि के. सी. वेणुगोपाल यांनी आमदारांच्या राजीनाम्यांची घोषणा केली आहे. वाचा सविस्तर...

निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास अबाधित राखा; राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला आवाहन

नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांनी आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांची भेट घेतली. देशातील लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील असलेला विश्वास अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी निवेदन त्यांनी आयोगाला दिले आहे. वाचा सविस्तर...

मुसळधार पावसाचा मंत्रालयाला फटका; तळ मजल्यावर सिलिंगचा भाग कोसळला

मुंबई - एकीकडे मुसळधार पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच या पावसाचा मंत्रालयाला फटका बसला आहे. मंत्रालयातही सिलिंगवर पाणी झिरपल्याने सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान सिलिंगचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही. वाचा सविस्तर...

येत्या ४८ तासात मुंबईत कोसळणार मुसळधार.. समुद्रकिनारी सतर्कतेचा इशारा

मुंबई - येत्या ४८ तासात मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारी (८ जूलै) दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. मुंबई विमानतळावरही रनवेवर पाणी जमा झाल्याने जवळपास २५ मिनिटे विमानांच्या उड्डाणावर याचा परिणाम झाला होता. यामुळे काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले. वाचा सविस्तर...

राष्ट्रवादीच्या दगाबाजीमुळेच अशोक चव्हाणांचा पराभव; विधानसभेपूर्वीच अमिता यांचा राष्ट्रवादीवर आरोप

नांदेड - लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उघडपणे भाजपचे काम करत होते. राष्ट्रवादीने दगाबाजी केल्यामुळे चव्हाण पराभूत झाले, असा आरोप भोकरच्या काँग्रेस आमदार अमिता चव्हाण यांनी केला. मुदखेड येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. वाचा सविस्तर...

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.